जयपूर : निकालानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी राजभवन गाठून राज्यपाल कलराज मिश्रा (Kalraj Mishra) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान बहुमत मिळवणाऱ्या भाजपात मुख्यमंत्रिपदाच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी तिजारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले बाबा बालकनाथ (Baba Balaknath) यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
कन्हैया लाल हत्याकांडाच्या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले, आम्ही या प्रकरणात पूर्ण न्यायपर्यंत पोहोचू. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात महिलांवर अत्याचार झाले. पण आता गँगस्टर, गुंड शोधूनही सापडणार नाहीत आणि जनतेला न्याय मिळेल.
उत्तर आणि दक्षिणेच्या राजकारणावर बाबा बालकनाथ म्हणाले, तेलंगणात मतांची टक्केवारी वाढली आहे. भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. भाजपा लोकांपर्यंत पोहोचत आहे. नरेंद्र मोदी तिथेही खूप लोकप्रिय आहेत, देशात आणि परदेशात सर्वत्र लोकप्रिय आहेत.