Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitesh Rane : मराठा सांस्कृतिक भवनाचे ‘या’ दिवशी उद्घाटन; मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा

कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. पुढील शिवजयंतीला मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन होईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 20, 2026 | 06:06 PM
Nitesh Rane assures that Maratha Cultural Bhavan will be built in Kankavali Political News

Nitesh Rane assures that Maratha Cultural Bhavan will be built in Kankavali Political News

Follow Us
Follow Us:

Nitesh Rane News : कणकवली : राज्य शासनाच्या माध्यमातून कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. या भवनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील सांस्कृतिक चळवळीला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. (Maharashtra News) राणे कुटुंबाचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळी असते, तो कधीही चुकत नाही. आज या वास्तूचे भूमिपूजन झाले असून पुढील वर्षी १९ फेब्रुवारी २०२७ रोजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत या वास्तूचे दिमाखात उद्घाटन होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कणकवली शहरात मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मंत्री राणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मुख्याधिकारी गौरी पाटील यासह अनेक मान्सवर आणि समाजबांधव उपस्थित होते.

हे देखील वाचा : ‘गलगोटिया रोबो’ने भारताची मान खाली झुकवली! एआय समिटमध्ये देशाची बदनामी

शिवरायांनी आपल्याला अन्याय आणि दडपशाहीविरुद्ध लढायला शिकवले

मंत्री राणे म्हणाले, शिवरायांनी आपल्याला अन्याय आणि दडपशाहीविरुद्ध लढायला शिकवले. त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि हिंदू धर्माचे रक्षण केले. आज काही लोक महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी करतात, पण ती कधीच होऊ शकत नाही. ज्याने ८००० हिंदूंची कत्तल केली, तो टिपू महाराजांच्या नखाचीही सर धरू शकत नाही. महाराजांनी कधीही कोणत्याही मशिदीकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही, त्यांनी न्यायाचे राज्य चालवले. स्वराज्यात जसे पारदर्शक प्रशासन होते, तसेच आमचे प्रशासन गतीने काम करत आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, शासनाच्या वतीने आम्ही पूर्ण ताकदीने हे सांस्कृतिक भवनाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यावेळी अ‍ॅड. उमेश सावंत, सतीश सावंत, भाई परब यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष राऊळ यांनी मराठा सांस्कृतिक भवन उभारण्यामागील भूमिका मांडली. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. सकल मराठा समाजाच्यावतीने पालकमंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.

हे देखील वाचा : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

राणे कुटुंबाचे नाते निवडणुकांपुरते नाही

सिंधुदुर्ग आणि राणे कुटुंबाचे नाते केवळ निवडणुकांपुरते नाही. २०१४ ते २०१९ या काळात आम्ही सत्तेत नव्हतो, पराभूत होतो, तरीही जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज उभे केले. त्या विचारातूनच आम्ही घडलो आहोत. ही वास्तू उभी करताना सकल मराठा समाजाने आपल्या सूचना द्याव्यात, कारण ही वास्तू सांभाळण्याची सामूहिक जबाबदारी तुमची आणि आमची आहे. सकल मराठा समाजातील ज्येष्ठ मराठा नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अक्षरसिंधू कलामंचतर्फे पालकमंत्र्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अजयकुमार सर्वगोड यांनी केले. सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले. आभार सुशील सावंत यांनी मानले.

Web Title: Nitesh rane assures that maratha cultural bhavan will be built in kankavali political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nitesh Rane
  • political news

संबंधित बातम्या

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ
1

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ

‘ज्यांच्या पोटात दुखत असेल असेल त्यांच्यासाठी ठाण्यात..,’ शरद पवार यांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार
2

‘ज्यांच्या पोटात दुखत असेल असेल त्यांच्यासाठी ठाण्यात..,’ शरद पवार यांच्या भेटीवरून एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार

‘संजय राऊत हे तर शरद पवारांचेच शिष्य’, एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर गृहराज्यमंत्र्यांचा घणाघात; ‘पवार NDA मध्ये आले तर…
3

‘संजय राऊत हे तर शरद पवारांचेच शिष्य’, एकनाथ शिंदेच्या भेटीनंतर गृहराज्यमंत्र्यांचा घणाघात; ‘पवार NDA मध्ये आले तर…

Nagpur Airport: नागपूर विमानतळाचा कायापालट! देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब उभारणार; ‘जीएमआर’ची ₹३२०० कोटींची योजना
4

Nagpur Airport: नागपूर विमानतळाचा कायापालट! देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब उभारणार; ‘जीएमआर’ची ₹३२०० कोटींची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.