कोलकाता: गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या काही भागात हिंसाचार घडत आहे. यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरुद्ध भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान यावर आता भाजप नेते अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी मोठे भाष्य केले आहे.
काय म्हणाले मिथुन चक्रवर्ती?
आम्हाला पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार नको आहे. सध्या बंगालमध्ये काही दुख:द घटना घडत आहेत. हिंसाचार होत असलेल्या भागातून हिंदूंना घरे सोडावी लागत आहेत. राज्यात कायदा- सुव्यवस्था बिघडली आहे. सध्या मुरशीदाबादमध्ये झालेल्या हिंसेने मी व्यथित झालो आहे. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी आहे. तसेच पुढील निवडणुका या लष्कराच्या देखरेखीखाली व्हाव्यात अशी माझी मागणी आहे.
मुर्शिदाबादमधील पीडितांची राज्यपालांनी घेतली भेट
पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी मुर्शिदाबादचा दौरा केला. मानवाधिकार आयोग आणि राज्यपालांनी पीडित कुटुंबाच्या भेटी देखील घेतल्या. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राज्यपाल काय म्हणाले ते जाणून घेऊयात. ‘येथील पीडित कुटुंबांना सुरक्षेची खात्री हवी आहे. अर्थातच त्यांच्या काही इतर मागण्या किंवा सूचना देखील आहेत. या सर्वांचा विचार केला जाईल.”
वक्फ कायद्यावरून बंगाल पेटलं
मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले आहे.
मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या हिंसाचारावर केंद्र आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. हिंसाचाराचे लोण आणखी पसरू नये यासाठी मुर्शिदाबाद आणि अन्य काही जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १५० लोकांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सिव्ही आनंद बोस व राजभवनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
मुर्शिदाबादमध्ये केंद्र सरकारने बीएसएफच्या जवळपास ९ तुकड्या तैनात केल्या आहेत. वेळ पडल्यास या ठिकाणी सीआरपीरफ आणि आरपीएफ दल सुद्धा तैनात केले जाऊ शकते. केंद्र सरकार त्या ठिकाणी संकटात साडपलेल्या लोकांना मदत करत आहे. पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद जिल्ह्यात उमरपूर-बानिपूर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. पोलिसांची वाहने पेटवली गेली आहेत. राष्ट्रीय महामार्ग देखील जाम केला गेला आहे. पोलिसांच्या वाहनाला आग लावल्याने येथे सध्या तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.