Rahul Gandhi Priyanka Gandhi Kiss openly public
Rahul Gandhi openly kiss priyanka gandhi : मध्य प्रदेश : विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि कॉंग्रेस खासदार प्रियांका गांधी हे बहीण भावाची जोडी अनेकदा एकत्र प्रचार करताना दिसून येते. दोन्ही नेते कॉंग्रेस पक्षाला मजुबती देताना दिसून येतात. या प्रचारावेळी दोन्ही नेत्यांमधील भावा-बहिणींचे प्रेम अनेकदा दिसून येते. मात्र यावर भाजपचे जेष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी गंभीर टीका केली आहे. शाजापूर येथील आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप मंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, “आजचे आपले विरोधी पक्षनेते असे आहेत जे स्वतःच्या बाहिणीला सार्वजनिक ठिकाणी किस करतात. मी तुम्हाला (लोकांना) विचारू इच्छितो, तुमच्यापैकी कुणी असा आहे का, जो आपल्या तरूण मुलीला किंवा बहिणीला अशापद्धतीने सार्वजनिक ठिकाणी किस करत असेल. यांच्या संस्काराचा अभाव आहे. यांचे संस्कार विदेशी आहेत. भारतात फक्त आपलेच संस्कार चालणार” असे वक्तव्य कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे. यावरुन जोरदार राजकीय वादंग निर्माण झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नात्यावर केलेल्या वक्तव्यावरुन कॉंग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच जोरदार टीका देखील केली जात आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला भाजपचे नेते पचवू शकलेले नाही, अशा शब्दांत कॉंग्रेस नेत्यांनी टीकास्त्र डागले.
कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिनव बरोलिया यांनी म्हटले की, त्यांनी महिलांच्या कपड्यांवरून अश्लाघ्या विधान केले आहे. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. त्यांनी राजकीय शिष्टाचार मोडला असून त्याचा अवमान केला आहे. त्यांना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची लोकप्रियता रुचलेली दिसत नाही, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते अभिनव बरोलिया यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल गांधींना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. वाराणसीतील खासदार-आमदार विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी गांधी यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. गांधींविरुद्धचा खटला आता वाराणसी न्यायालयात सुरू राहील. सप्टेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान, राहुल गांधी यांनी जॉर्जटाऊन विद्यापीठातील एका कार्यक्रमात शीख समुदायाबाबत विधान केले होते. ते म्हणाले होते, “भारतातील वातावरण शिखांसाठी सुरक्षित आहे का? ते पगडी, ‘कड’ (पवित्र धागा) घालू शकतात आणि गुरुद्वाराला भेट देऊ शकतात का?” या टिप्पणीमुळे देशात वाद निर्माण झाला. भाजपने राहुल यांचे विधान देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारे आणि “राष्ट्रविरोधी” असे म्हटले.