BJP National President: अध्यक्षपदावरून RSS-भाजपमध्ये बिनसलं? गडकरींच्या उत्तराने उंचावल्या भुवया
1. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष कधी घोषित होणार याकडे सर्वांचे लक्ष
2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये एकमत नसल्याचे म्हटले जात आहे
3. सध्या अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत
BJP National Presidnet Election: मागील काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिकामी आहे. भाजपच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की अनेक महीने भाजपच्या अध्यक्षपदाची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान आता हा प्रश्न नक्की कधी सुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत केंद्रीय नितीन गडकरींना प्रश्न विचारले असता त्यांनी काय उत्तर दिले ते जाणून घेऊयात.
बिहार विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न केंद्रिय नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. यावेळी नितीन गडकरींनी या प्रश्नाचे उत्तर केवळ जेपी नड्डाच देऊ शकतात. तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारला आहात, असे उत्तर दिले.
गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या जेपी नड्डा हेच भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहत आहेत. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नावावर एकमत होत नसल्याचे म्हटले जात आहे.
आगामी काळात देशातील अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधी भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नावाची घोषणा करू शकतो. नवीन अध्यक्ष्याच्या नेतृत्वात भाजप निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
कोणाच्या नावाची चर्चा?
भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अनेक नावाची चर्चा सुरु असल्याचे समोर आले आहे. अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री तसेच संघटनेतील वरिष्ठ पदावरील नेतेमंडळी यांची नावे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आल्याचे सांगितले जात आहे.
भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार! १५ ऑगस्टनंतर होऊ शकते घोषणा; ही ४ नावे शर्यतीत, सर्वात वरच्या व्यक्तीचं नाव वाचून बसेल धक्का
नवीन अध्यक्षांसमोर निवडणुकांचे आव्हान
या पदावर कोणताही नवा चेहरा आला, तरी त्याला काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्षाला २०२५ मधील बिहार विधानसभा निवडणुकांपासून सुरू होणाऱ्या आगामी निवडणुकींचा सामना करावा लागेल. यानंतर २०२६ मध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामसारख्या राज्यांतील विधानसभा निवडणुका त्यांच्यासाठी खरी कसोटी ठरणार आहेत.