J & K Election: भाजपने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी, केवळ 'या' उमेदवाराला मिळाली संधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. दरम्यान जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी लिस्ट जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली होती. मात्र थोड्याच वेळात ती यादी भाजपने मागे घेतली होती. पहिल्या यादीत ४४ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
आज भाजपने पुन्हा एकदा नवीन यादी जाहीर केली आहे. या सुधारित यादीत १५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीतील १५ जणांचीच नावे यामध्ये आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी भाजपने १५ उमेदवारांची घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान हे १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या यादीत भाजपने केवळ एका उमेदवाराची घोषणा केली आहे. कोकरनाग येथून चौधरी रोशन हुसेन गुज्जर यांना तिकीट देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. त्यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दक्षिण काश्मीरमधील १६ तर जम्मूमधील ८ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. भाजपने अद्याप त्राल, पुलवामा, जैनापोरा, डी. एच. पोरा, कुलगाम, देवसर, दूरू, कोकेरनाग या भागातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
भारतीय जनता पार्टी द्वारा आज दिनांक 26.08.2024 सोमवार को जम्मू व कश्मीर विधानसभा चुनाव 2024 हेतु प्रथम चरण के प्रत्याशियों की पहली सूची जारी की गई। pic.twitter.com/vgXzf4m7aZ
— BJP (@BJP4India) August 26, 2024
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिले मतदान हे १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये एकूण ९० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच निवडणुकीचे निकाल ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. २०१९ मध्ये जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.