Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुल यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल अपयशी; राहू–खामगाव, खडकी–देऊळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचा पराभव

राहू–खामगाव आणि खडकी–देऊळगावराजे जिल्हा परिषद गटात आमदार कुल यांनी भाजपकडून उभे केलेले उमेदवार पराभूत झाल्याने, कुल यांचा तथाकथित ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल फसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2026 | 01:29 PM
कुल यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल अपयशी; राहू–खामगाव, खडकी–देऊळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचा पराभव

कुल यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल अपयशी; राहू–खामगाव, खडकी–देऊळगाव जिल्हा परिषद गटात भाजपचा पराभव

Follow Us
Follow Us:
  • कुल यांचा ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल अपयशी
  • जनतेने कुल यांच्या उमेदवाराला नाकारले
  • जिल्हा परिषद गटात भाजपचा पराभव
यवत : राहू–खामगाव आणि खडकी–देऊळगावराजे जिल्हा परिषद गटात आमदार कुल यांनी भाजपकडून उभे केलेले उमेदवार पराभूत झाल्याने, कुल यांचा तथाकथित ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल फसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीपूर्वी कुल यांनी आखलेल्या राजकीय डावपेचांचा मोठा गवगवा करण्यात आला होता. मात्र निकालाने त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

 

खडकी–देऊळगाव जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. ही जागा हमखास जिंकणार, असा आत्मविश्वास कुल यांना होता. मात्र तिरंगी लढतीत बाबा जगदाळे यांनी बाजी मारली आणि आप्पासाहेब पवार यांचा पराभव झाला.

राहू–खामगाव गटात कुल यांनी आपल्या तीस वर्षांच्या विश्वासू कार्यकर्त्या अनिल सोनवणे यांना संधी दिली होती. राहू हा कुल यांचा बालेकिल्ला मानला जातो. मागील दोन जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये येथे भाजपने विजय मिळवला होता. मात्र यावेळी मतदारांनी प्रथमच कुल यांच्या विरोधात भूमिका घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून दिले. हा निकाल कुल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बोरी–पारधी–केडगाव गटात खुल्या आरक्षणाच्या जागेवर ओबीसी उमेदवार उभा करूनही भाजपला यश मिळाले नाही. येथेही मतदारांनी कुल यांच्या विरोधात कौल देत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून दिले. गोपाळवाडी–कानगाव, वरवंड–पारगाव आणि पाटस–कुरकुंभ जिल्हा परिषद गटातही अशीच परिस्थिती दिसून आली. या सर्व गटांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

तालुक्यातील राजकीय चर्चेनुसार, राष्ट्रवादी पक्षाने तुल्यबळ, जनसंपर्क असलेले, जनतेशी सौजन्याने वागणारे आणि विकासाची तळमळ असणारे उमेदवार दिले होते. दुसरीकडे कुल गटावर दादागिरी, दहशत आणि दबावाच्या राजकारणाचे आरोप होत असून, याच पार्श्वभूमीवर मतदारांनी कुल विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

प्रचारातील नियोजनाचा अभाव

यवत–बोरींभडक गटात भाजपला मिळालेला विजय अपवादात्मक ठरला. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत नाराजी, धनगर समाजाला उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली असंतोषाची भावना, प्रचारातील नियोजनाचा अभाव आणि कार्यकर्त्यांतील अनास्था यामुळे भाजपचा उमेदवार अत्यल्प मतांनी विजयी झाला. मतमोजणीदरम्यान वाद निर्माण होऊन राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते आणि निवडणूक प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा : शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट

जनतेने कुल यांच्या उमेदवाराला नाकारले

राहू गटातील पराभव कुल यांना विशेषतः जिव्हारी लागणारा ठरला आहे. यापूर्वी सलग दोन वेळा राहूची जागा भाजपने जिंकली होती. मात्र यावेळी राहूच्या जनतेने कुल यांच्या उमेदवाराला नाकारत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून दिले. हा निकाल तालुक्यातील राजकारणाला नवे वळण देणारा मानला जात आहे.

Web Title: Mla rahul kul has been defeated in the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Rahul Kul
  • ZP Election Results

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
4

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.