Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandigarh Mayoral Election: ‘आप-काँग्रेस’चा गेम; संख्याबळ नसताना भाजप विजयी, क्रॉस व्होटिंगवरून राजकारण तापणार?

AAP - Congress: चंदीगडमध्ये महापौरपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. भाजपचा विजय झाल्याने आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 30, 2025 | 03:00 PM
Chandigarh Mayoral Election: 'आप-काँग्रेस'चा गेम; संख्याबळ नसताना भाजप विजयी, क्रॉस व्होटिंगवरून राजकारण तापणार?

Chandigarh Mayoral Election: 'आप-काँग्रेस'चा गेम; संख्याबळ नसताना भाजप विजयी, क्रॉस व्होटिंगवरून राजकारण तापणार?

Follow Us
Close
Follow Us:

चंदीगड: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शेवटच्या टप्यात आला आहे. याच दरम्यान चंदीगडमध्ये महापौरपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या उमेदवार असलेल्या हरप्रीत बाबला या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचा विजय झाल्याने आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

भाजपने चंदीगड महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. हरप्रीत बाबला या भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. हरप्रीत बाबला या दुसऱ्यांदा नगरसेवक बनल्या आहेत. तर आता त्या चंदीगडच्या नवीन महापौर असणार आहेत. तर आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रेमलता या पराभूत झाल्या आहेत. हरप्रीत बाबला यांना 19 मते मिळाली. तर प्रेमलता यांना 17 मते मिळाली. हरप्रीत बाबला या निवृत्त कर्नल यांची मुलगी आणि माजी महापौर देविन्दर सिंह यांच्या पत्नी आहेत.

महापौरपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आहे. भाजपकडे आधी 16 च मते होती. मात्र क्रॉस व्होटिंग झाल्याने तीन मते भाजपकडे ट्रान्सफर झाली आणि भाजपचा उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीत कॉँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे एकत्रितपणे निवडणूक लढत होते. त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. मात्र या ठिकाणी एकत्रित लढत असलेले हे दोन पक्ष दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मात्र आमने-सामने लढत आहेत.

चंदीगड महानगरपालिकेत भाजप 16 नगरसेवकांसाह सर्वात मोठा पक्ष आहे. तर आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेसकडे अनुक्रमे 13 आणि 6 नगरसेवक आहेत. यामुळे कॉँग्रेस आणि आपकडे एकूण 19 मतांचे पाठबळ होते. मात्र क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे भाजपने महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. भाजपच्या हरप्रीत बाबला या चंदीगडच्या नवीन महापौर बनल्या आहेत.

काय म्हणाले देविंदरसिंह बाबला ? 

भाजप जिंकणार याचा आम्हाला पहिल्यापासूनच विश्वास होता असे हरप्रीत बाबला यांचे पती देविंदर सिंह बाबला म्हणाले. महापौर कुलदीप कुमारने केवळ जनतेला लुबाडण्याचे काम केले. ते केवळ स्वतःसाठी कमवत होते. नगरसेवक देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. यामुळे लोकांनी आम्हाला मते दिली.

Web Title: Bjp won chandigarh mayoral election candidate harpreet babla beats aap and congress candidate premlata before delhi election marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • AAP
  • BJP
  • Chandigarh

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
2

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
3

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!
4

होय, मी कट्टर भाजप समर्थक, महेश कोठारे यांच्या विधानांनंतर निवेदिता सराफांचे वक्तव्य चर्चेत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.