Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat Bridge Collapse: गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळला, ३ जणांचा मृत्यू

हा पूल १९८१ मध्ये बांधण्यात आला होता. १९८५ मध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु कालांतराने पुल जीर्ण होऊ लागला. स्थानिक आमदार चैतन्य सिंह झाला यांनी या पुलाबद्दल आधीच इशारा दिला होता

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 09, 2025 | 11:52 AM
Gujrat Bridge Collapse:  गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळला, ३ जणांचा मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

Gujrat Bridge Collapse:  गुजरातमधील महिसागर नदीवर बांधलेला पूल कोसळला आहे. या अपघतात पाच वाहने पुलावरून खाली पडली तर तीन जणांना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याचवेळी पाच जणांना वाचवण्यात यश आल्याचेही सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  हा पूल १९८५ मध्ये बांधण्यात आला होता. घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी तज्ञांचे एक पथक घटनास्थळी पाठवले असून त्यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पूल कोसळण्याच्या घटनेबद्दल रस्ते आणि इमारती विभागाचे सचिव पी.आर. पटेलिया म्हणाले, “गंभीरा पूल खराब झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे ज्यामुळे ही दुर्घटना घडली. तज्ञांची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.”

Solapur Dudh Sangh Scam: सोलापूर दूध संघ भ्रष्टाचार प्रकरण; अभिजीत पाटील विधानसभेत चौकशीची मागणी

इशारा देऊनही, पुलावरील वाहतूक  सुरूच

पूल कोसळल्याने नदीत पडलेल्या ५ वाहनांपैकी दोन ट्रक पूर्णपणे नदीत बुडाले, तर एक टँकर अर्धा लटकलेला राहिला. पूल कोसळताच घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल १९८१ मध्ये बांधण्यात आला होता. १९८५ मध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु कालांतराने पुल जीर्ण होऊ लागला. स्थानिक आमदार चैतन्य सिंह झाला यांनी या पुलाबद्दल आधीच इशारा दिला होता आणि नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती. असे असूनही, पुलावरून वाहनांची वाहतूक थांबली नाही. आता सरकारने २१२ कोटी रुपये खर्चाच्या नवीन पुलाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे आणि त्यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात आले आहे.

Fashion Day : आजचा ‘हा’ दिवस म्हणजे तुमची वेगळी ओळख जगासमोर मांडण्याचा खास दिवस

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातानंतर लगेचच अधिकारी सक्रिय झाले आणि नदीत पडलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याच वेळी, पोहणाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली.

६ जण पाड्रा येथील स्थानिक रुग्णालयात तर  २ जण वडोदरा रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.  या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. ६ जणांना पाड्रा रुग्णालयात आणि २ जणांना वडोदऱ्यातील सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी जमली होती. त्यांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. ४५ वर्षे जुन्या या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा कळवण्यात आल्याचे लोकांनी सांगितले. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ही दुर्घटना घडली. या अपघाताला प्रशासन पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक लोक करतात.

Web Title: Bridge collapses on mahisagar river in gujarat 3 dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Gujrat News

संबंधित बातम्या

गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता
1

गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

दलित वृद्धाच्या रहस्यमयी हत्येमागचं थरारक सत्य समोर, ‘गीता मृत’ दाखवून प्रियकरासोबत पळून जाण्याचा कट उघड
2

दलित वृद्धाच्या रहस्यमयी हत्येमागचं थरारक सत्य समोर, ‘गीता मृत’ दाखवून प्रियकरासोबत पळून जाण्याचा कट उघड

Mundra Port Drug  Case: मुंद्रा बंदर २१ हजार कोटी ड्रग्ज प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला व्यवसायिकाचा जामीन
3

Mundra Port Drug Case: मुंद्रा बंदर २१ हजार कोटी ड्रग्ज प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला व्यवसायिकाचा जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.