Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TCS limit : इन्कम टॅक्ससह आणखी एका टॅक्समध्ये मोठी सूट, निर्मला सीतारामण यांची घोषणा

आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत टॅक्स अॅट सोर्स एकत्र करण्याची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी टीसीएसची मर्यादा ७ लाखांवरून १० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 01, 2025 | 10:30 PM
इन्कम टॅक्ससह आणखी एका टॅक्समध्ये मोठी सूट, निर्मला सीतारामण यांची घोषणा

इन्कम टॅक्ससह आणखी एका टॅक्समध्ये मोठी सूट, निर्मला सीतारामण यांची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५ च्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला उतन्नावरील करासंदर्भात दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पीय भाषणात, आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत टॅक्स अॅट सोर्स एकत्र करण्याची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी टीसीएसची मर्यादा ७ लाखांवरून १० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रेमिटन्सवर टिसीएस काढून टाकण्याचाही प्रस्ताव मांडला आहे.

एफईच्या अहवालानुसार, अबंस इन्वेस्टमेंट मॅनेजर्सचे सीईओ भाविक ठक्कर सांगतात, १० लाख रुपयांपर्यंतच्या एलआरएस रेमिटन्सवर टीसीएसवर दिलेली सूट हे गुंतवणूकदारांसाठी जागतिक फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. पूर्वी याची मर्यादा ७ लाख रुपये होती. टीसीएस रेमिटन्स म्हणजे परदेशात पैसे पाठवल्यावर बँका किंवा वित्तीय संस्थेद्वारे आकारण्यात आलेला कर. पाठवलेली रक्कम मर्यादापेक्षा जास्त असल्यास त्यावर कर आकारला जातो. हा कर परदेशात पैसे पाठवण्यापूर्वी बँक किंवा रेमिटेन्स सर्विसद्वारे कापला जातो.

मोठ्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे आणि करचोरी रोखणे.

शिक्षण, प्रवास आणि परदेशातील गुंतवणूक यावर टीसीएस आकारला जातो.

वैद्यकीय आणि शैक्षणिक कारणासाठी पाठवलेल्या पैशांवर टीसीएस आकारला जात नाही.

१ ऑक्टोबर २०२३ पासून, वार्षिक ७ लाख रूपयांपेक्षा अधिक पैसे परदेशात पाठवल्यास त्यावर २० टक्के टीसीएस आकारण्यात येत आहे.

फॉरेन रेमिटन्स म्हणजे भारतातून दुसऱ्या देशात निधी ट्रान्सफर करणे. प्रवास शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि गुंतवणूक यांसारख्या विविध कारणांसाठी कुणीही पैसे पाठवू शकतो. परंतू ते अधिकृतपणे बँका आणि मनी ट्रान्सफर सेवांद्वारे ट्रान्सफर करायला हवेत.

शिक्षण क्षेत्रासाठी महत्वाचे निर्णय

अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२५-२६ वित्तीय वर्षासाठी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे की या अर्थ संकल्पात तरुण, महिला, शेतकरी आणि देशातील गरिबी रेषेच्या खालच्या समुदायाचा विचार करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

तरुणांमध्ये विज्ञान क्षेत्राचा प्रसार करण्याचा निर्धार या अर्थ संक२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी अटल टिकरिंग लॅब, डिजिटल ब्रॉडबँड, कौशल्य वाढीचे सेंटर, भारतीय भाषा पुस्तक स्कीम, तसेच वैद्यकीय आणि IIT क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.ल्पनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. अर्थ संकल्पनेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे कि येत्या ५ वर्षांमध्ये देशात जवळजवळ ५० हजार अटल टिकरिंग लॅब उभारण्यात येणार आहे. याचा तरुणांना मोठा लाभ घेता येणार आहे. तसेच या डिजिटलायजेशनच्या युगात, बजेटमध्ये एक महत्वाची बाब मांडण्यात आली आहे. लवकरच देशातील सर्व सरकारी शाळांमध्ये डिजिटल ब्रॉडबँड बसवण्यात येणार आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमधील डिजिटल अंतर कमी करण्याचा निर्धार या बजेटच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच शाळांमध्ये आरोग्य विभाग उभारण्यावर लक्ष दिले जाईल.

 

Web Title: Budget 2025 tcs limit increased tax relief on foreign remittance nirmala sitharaman announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 10:30 PM

Topics:  

  • Budget 2025
  • union budget
  • Union Budget 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.