'कॅनडातील हिंसाचार विरोधात कठोर कारवाई करा'; पंजाब समाजाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री मान यांची मागणी
नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे शीख फुटीरतावाद्यांनी एका हिंदू मंदिरावर हल्ला केला होता. यादरम्यान खलिस्तान समर्थकांनी मंदिरात घुसून हिंदूंना लाठीमार केला. त्यानंतर या प्रकरणावर भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि दोषींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. तसेच त्यांनी केंद्र सरकारने कॅनडाच्या सरकारशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली.
दोषींवर कडक कारवाई करण्याची मुख्यमंत्री मान यांची मागणी
याबाबत बोलताना मान यांनी म्हटले की, कॅनडाला लाखो पंजाबींचे दुसरे घर मानले जाते. कॅनडामध्ये त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध सौहार्दपूर्ण राहावेत. अनेक पंजाबी लोक कॅनडामध्ये जाऊन आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करतात. मात्र “कॅनडात काल जे घडले ते अत्यंत निंदनीय आहे. “दुर्दैवाने, विभाजन आणि द्वेषाची राजकारण कॅनडात पसरली आहे,” असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी भारतीय सरकारकडे कॅनडाच्या सरकारसोबत चर्चा करून या घटनेमागील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करतो.” असेही मान यांनी स्पष्ट केले. असे केल्याने भविष्यात अशा घटना घडू नयेत याचा धाक बसू शकेल.
एक्सवर लाईव्ह संवाद साधला
मान यांनी या संवेदनशील मुद्द्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लाईव्ह संवाद साधला. त्यांनी या गटनांचा तीव्र निषेध करत म्हटले की, “पंजाबी लोक नेहमीच सर्वांच्या भल्यासाठी प्रार्थना करतात आणि शांततेचे समर्थन करतात. याच कारणामुळे त्यांना संपूर्ण जगभर प्रेम आणि आदराने पाहिले जाते. पंजाबी लोकांनी त्यांच्या कष्ट आणि कौशल्याने संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
परंतु अशा घटनांमुळे पंजाब आणि पंजाबी लोकांना लाज वाटते, म्हणूनच या घटना टाळायला हव्यात. कॅनडातल्या हजारो हिंदूंनी ब्रॅम्पटनमध्ये हिंदू मंदिरांवरील सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांविरोधात एकजूट दर्शविण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कॅनडातील राजकारणी आणि कायदा-व्यवस्था यंत्रणांवर खलिस्तानी लोकांचा समर्थन न करण्यासाठी काढण्यात आला होता.
पंतप्रधान मोदींनी देखील हल्ल्याचा निषेध केला
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करत, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावण्याचा हा खालचा प्रयत्न असल्याचे म्हटले आणि कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडून न्याय मिळवण्याची आशा व्यक्त केली. कॅनडात राहत असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल भारत सरकार “गंभीर चिंता” व्यक्त करत आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. कारण कॅनडा भारतातील खलिस्तानी