
केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद; कर्करोग आणि मधुमेहाची औषधे स्वस्त होणार
Union Budget 2026 News In Marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे २०२५ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, मोदी सरकार 3.0 चा हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली जात आहे. त्यात आरोग्य क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या.
आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात देशातील बायोफार्मास्युटिकल क्षेत्राच्या विकासामुळे कर्करोग आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवरील औषधं स्वस्त होतील. सीतारमण यांनी १०००० कोटी रुपयांचा एसएमई ग्रोथ फंडही जाहीर केला. भविष्यातील नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि निवडक निकषांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार १०००० कोटी रुपयांचा समर्पित एसएमई ग्रोथ फंड सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेदेखील वाचा : Budget 2026 Live: “गेल्या वर्षी भारताची आर्थिक स्थिती…”; बजेट मांडताना अर्थमंत्र्यांचे मोठे विधान
या अर्थसंकल्पातील उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या दशकात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर केला जात आहे. लोकसभा निवडणुकीमुळे २०२५ मध्ये अंतरिम अर्थसंकल्प आणि जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, मोदी सरकार ३.० चा हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प आहे. परिणामी, २०२६ चा अर्थसंकल्प हा सरकारचा दीर्घकालीन आर्थिक रोडमॅप म्हणून पाहिला जात आहे.
बायोफार्मास्युटिकल्ससाठी १०००० कोटी रुपयांची तरतूद
अर्थमंत्र्यांनी देशातील बायोफार्मास्युटिकल्ससाठी १०००० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. ही तरतूद पाच वर्षांत करण्याचं नियोजन आहे. त्यांनी सांगितलं की, देशाला बायोफार्मास्युटिकल हबमध्ये रूपांतरित केले जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, यामुळे गंभीर आजारांसाठी औषधं परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील.
आयुर्वेदिक शिक्षण देणाऱ्या तीन नव्या संस्था स्थापन करणार
कोविडनंतर योगा आणि आयुर्वेदाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता आयुर्वेदिक शिक्षण देणाऱ्या तीन नव्या संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. पशुवैद्यक कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली गेली आहे.
हेदेखील वाचा : Budget 2026 : आधी राष्ट्रपतींची भेट अन् नंतर संसदेच्या आवारात फोटोशूट…! अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी काय असतो Protocol