Finance Minister Nirmala Sitharaman on Union Budget 2026-27
गेल्या वर्षी भारताची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे भाष्य
सरकारचे गुंतवणूक वाढवण्यावर जास्त लक्ष
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडले बजेट
Nirmala Sitharaman: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. विकसित भारताचा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थनसंकल्प सादर करत असताना देशाच्या आर्थिक स्थिती विषयी महत्वाचे विधान केले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “मी आज माघ पौर्णिमा आणि गुरू रविदास यांच्या जयंतीच्या शुभ दिनानिमित्त अर्थसंकल्प सादर करत आहे. गेल्या वर्षभरात भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे. गेल्या 12 वर्षांपासून आमचे सरकार गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहे. ”
पुढे बोलताना अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अनेक बदल करण्यात आले आहेत. स्वावलंबन हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य मंत्र आहे. सरकारी निर्णयाचा नागरिकांना फायदा व्हावा यासाठी आम्ही सर्वोपरी प्रयत्न केले आहेत. गेल्या वर्षी देशाची अर्थव्यवस्था 7 टक्के विकास दराने वाढली आहे.”
सात रेल्वे स्पीड कॉरिडॉरची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुडीसह सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर
मुंबई-पुणे
पुणे-हैदराबाद
हैदराबाद-बेंगळुरू
हैदराबाद-चेन्नई
चेन्नई-बेंगळुरू
दिल्ली-वाराणसी
वाराणसी-सिलिगुडी
पाच वर्षांत २० नवीन जलमार्ग कार्यान्वित होतील. वाराणसी आणि पटना येथे जहाज दुरुस्ती सुविधा स्थापन केल्या जातील. सीप्लेन व्हीजीएफ योजना सुरू केली जाईल.
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २,५५,४४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कवच प्रणाली: मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘कवच’ या स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणालीच्या विस्तारासाठी तरतूद वाढवण्यात आली आहे.
स्थानक पुनर्विकास: ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत, आधुनिकीकरणासाठी १,३३७ स्थानके निवडण्यात आली आहेत, त्यापैकी १,१९७ स्थानकांवर काम सुरू झाले आहे.
वंदे भारत आणि बुलेट ट्रेन: नवीन वंदे भारत गाड्या सुरू करणे आणि बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी (NHSRCL) २१,००० कोटी रुपयांची गुंतवणूक सुरू राहील.
लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक वाहतूक: मालवाहतूक क्षमता वाढवण्यासाठी ऊर्जा कॉरिडॉर आणि जास्त वाहतूक असलेल्या भागात ट्रॅक दुहेरीकरण आणि विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.






