Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक करा’; राज्यपाल बागडेंची संतप्त प्रतिक्रिया

महिलांवर अत्याचार होतात तेव्हा लोक व्हिडिओ बनवतात. हे बरोबर नाही. कोणाही महिलेचा विनयभंग झाला, तर त्या पुरूषाला पकडा. तो माणूस आहे, तूही माणूस आहेस आणि तुझ्यासोबत २ ते ४ लोक येतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 12, 2025 | 08:25 AM
'महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक करा'; राज्यपाल बागडेंची संतप्त प्रतिक्रिया

'महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक करा'; राज्यपाल बागडेंची संतप्त प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

जयपूर : गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यावरून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ‘महिलांना त्रास देणाऱ्यांना मारहाण करावी आणि बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक करून सोडले पाहिजे, तरच असे गुन्हे कमी होतील’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी सोमवारी व्यासपीठावरून हे भाषण केले. राज्यपाल बागडे म्हणाले की, ‘जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात राज्य करत होते, गावचा प्रमुख असणाऱ्या पाटलाने बलात्कार केला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी एक आदेश काढला. बलात्कार करणाऱ्याला मारू नका, त्याचे हातपाय तोडून टाका. तो मरेपर्यंत तसाच राहिला पाहिजे, असा तो आदेश होता’.

राज्यपाल बागडे पुढे म्हणाले की, ‘महिलांवर अत्याचार होतात तेव्हा लोक व्हिडिओ बनवतात. हे बरोबर नाही. कोणाही महिलेचा विनयभंग झाला, तर त्या पुरूषाला पकडा. तो माणूस आहे, तूही माणूस आहेस आणि तुझ्यासोबत २ ते ४ लोक येतील. जोपर्यंत आपल्या मनात ही मानसिकता येत नाही की, आपण घटनास्थळी जाऊन विनयभंग करणाऱ्याला, बलात्कार करणाऱ्याला थांबवावे आणि त्याला मारहाण करावी, तोपर्यंत हे गुन्हे थांबणार नाहीत’.

कायद्याची भीती राहिलेली नाही

गुन्हेगारांना कायद्याची भीती आहे की नाही हे माहित नाही. पण कोणी १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा विनयभंग केला, बलात्कार केला किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. तरीही असे गुन्हे थांबत नाहीत आणि असे प्रकार रोज ऐकायला मिळतात. यावरून असे दिसून येते की, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही. कायद्याची भीती बाळगणे काय असते याची तुम्ही कल्पना करू शकता का? कायदे असूनही अशा घटना का घडतात, याबद्दल तुम्ही सूचना देऊ शकता? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असेही बागडे म्हणाले.

Web Title: Castrate those who abused women says governor haribhau bagde nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 08:25 AM

Topics:  

  • maharashtra crime cases

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.