Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

अहिल्यानगरच्या बालिकाश्रम रोडवर सायंकाळच्या वेळी अचानक घडलेल्या चाकूहल्ल्याने खळबळ उडाली. ५५ वर्षीय रविंद्र चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर नेमका कोण आणि हल्ल्यामागचे कारण काय, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 08, 2026 | 09:19 AM
Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Follow Us
Follow Us:
  • गजबजलेल्या बालिकाश्रम रोडवर रविंद्र चव्हाण यांच्यावर अचानक चाकूने हल्ला
  • गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल; उपचारादरम्यान मृत्यू
  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध सुरू

अहिल्यानगर : शहरातील गजबजलेल्या बालिकाश्रम रोड परिसरात सायंकाळच्या सुमारास ५५ वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. रविंद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र चव्हाण हे बालिकाश्रम रोड परिसरात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. रस्त्यावर हा प्रकार घडल्याने नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत चव्हाण यांना उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचाराचे प्रयत्न करूनही त्यांची प्रकृती सुधारली नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली आणि संबंधितांशी चर्चा केली.

हेही वाचा: ‘भूत काढण्याच्या’ बहाण्याने अघोरी विधी; फलटणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र आणि इतर पुरावे मिळविण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच बालिकाश्रम रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. आरोपी हल्ल्यानंतर कोणत्या दिशेने पसार झाला, याचाही शोध घेतला जात आहे. रविंद्र चव्हाण यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. गजबजलेल्या परिसरात सायंकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Web Title: Ahilyanagar balikashram road 55 year old man murder knife attack sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Crime . Crime News
  • maharashtra crime cases
  • Murder Case

संबंधित बातम्या

Affair News: पत्नी खोलीत न दिसल्याने शेजाऱ्याच्या दारात पोहोचला अन् हादरला; संसाराचा अंत करत घेतला टोकाचा निर्णय; घडलं तरी काय?
1

Affair News: पत्नी खोलीत न दिसल्याने शेजाऱ्याच्या दारात पोहोचला अन् हादरला; संसाराचा अंत करत घेतला टोकाचा निर्णय; घडलं तरी काय?

Kho Kho Championship : माटुंग्यात गुरुवारपासून खो-खोचा महासंग्राम! 24 संघ भिडणार, मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस
2

Kho Kho Championship : माटुंग्यात गुरुवारपासून खो-खोचा महासंग्राम! 24 संघ भिडणार, मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस

 Murder Case: डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात…
3

 Murder Case: डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात…

Kolhapur Crime: प्रोजेक्टच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल!
4

Kolhapur Crime: प्रोजेक्टच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.