
CBI Special Court Delhi NEET Scam
या पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून परीक्षा प्रक्रियेतील विषय तज्ज्ञ मनीषा मांढरे, लातूरहून प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा हवालदार, शिकवणी वर्ग संचालक शिवराज मोटेगावकर, प्रा. तेजस शहा, तसेच मध्यस्थ डॉ. मनोज शिरुरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल यांना अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
यंदाच्या नीट-यूजी ३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्य उच्च शिक्षण विभागाने नोंदविली होती. नंतर हे प्रकरण ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आले होते. सीबीआयने पुणे, लातूर, राजस्थान, हरयाणा, दिल्लीसह देशभरात छापे टाकून आरोपींना अटक केली होती. कारवाईत लॅपटॉप, मोबाइल, तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणातील आरोपींची बँक खाती गोठविली असून, आरोपींकडून जप्त केलेल्या लॅपटॉप, संगणक, मोबाइल अशा साधनांची पडताळणी करण्यात आली. तपासात परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे’, अशी माहिती ‘सीबीआय’ने दिली आहे.
Rahul Gandhi In Lok Sabha: अमित शाहांनीच विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश दिले
‘आरोपींविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, विश्वासघात, पुरावा नष्ट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारास प्रतिबंध) कायदा २०२४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून ३६० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. पेपरफुटीच्या अनुषंगाने ४२२ पुरावे दिल्लीतील विशेष न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत’, असे ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.