Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahadev App : महादेव ॲपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर भारतात; ओमानमधून सीबीआयने आणले मायदेशी

Mahadev App : महादेव ॲप अवैध सट्टेबाजी प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरचे ओमानमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. सीबीआयचे पथक त्याला मस्कतमधून भारतात घेऊन आले असून रायपूरच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 01, 2026 | 08:53 PM
Mahadev App : महादेव ॲपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर भारतात; ओमानमधून सीबीआयने आणले मायदेशी

Mahadev App : महादेव ॲपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर भारतात; ओमानमधून सीबीआयने आणले मायदेशी

Follow Us
Follow Us:
  • देशातील मोठे अवैध सट्टेबाजी नेटवर्क
  • बनावट बँक खात्यांद्वारे पैशांची उलाढाल
  • भारताकडून ओमान सरकारचे आभार
 

भारतातील सर्वात मोठ्या सट्टेबाजीचे प्रकरण ज्याच्याभोवती फिरत होते, असा अवैध ऑनलाइन सट्टेबाज महादेव अॅपचा (Mahadev App) कर्ताधर्ता व मुख्य आरोपी सौरभ चंद्राकार ( याचे अखेरीस ओमानमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. आता त्याला रायपूर येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सौरभ चंद्राकर हा भारताला दोन सीबीआय प्रकरणांमध्ये हवा होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये यापूर्वीच आरोपपत्र दाखल झाले आहेत. तसेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या एका प्रकरणातही त्याच्याविरोधात अभियोजन तक्रार दाखल आहे. परदेशात राहून भारतातील नागरिकांविरोधात कटकारवाया करणाऱ्या फरार आरोपींना मायदेशी आणून कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने हे प्रत्यार्पण महत्त्वाचे मानले जात आहे.

देशातील मोठ्या अवैध सट्टेबाजी नेटवर्कपैकी एक

छत्तीसगड सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने महादेव ऑनलाइन बुकींग प्रकरणांचा तपास सुरू केला होता. तपासात महादेव ऑनलाइन बुकींग हे देशातील सर्वात मोठ्या अवैध ऑनलाइन सट्टेबाजी नेटवर्कपैकी एक असल्याचे समोर आले होते. हे नेटवर्क भारताबाहेरून चालवले जात होते.

या नेटवर्कच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल, पत्त्यांचे खेळ आणि इतर कार्यक्रमांवर अवैध सट्टेबाजी केली जात होती. यासाठी देशभरात फ्रँचायझी पद्धतीने ‘पॅनल’ आणि ‘ब्रँच’चे जाळे उभारण्यात आले होते. या माध्यमातून ग्राहक जोडणे आणि त्यांच्याकडून पैसे गोळा करण्याचे काम केले जात होते.

Washim Murder Case News: “आई रक्ताच्या थारोळ्यात अन् वडील गायब…” सकाळी मुलीने दरवाजा उघडताच उघडकीस आला भयानक प्रकार!

बनावट बँक खात्यांद्वारे पैशांची उलाढाल

अवैध सट्टेबाजीतून मिळणारी कमाई मोठ्या संख्येने बनावट बँक खात्यांद्वारे फिरवली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. अनेक टप्प्यांतील आर्थिक व्यवहारांनंतर ही रक्कम हवाला मार्गाने परदेशात पाठवली जात होती.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या अवैध कमाईतील काही हिस्सा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणाच्या मोबदल्यात दिला जात होता. त्यामुळे सिंडिकेटला कोणत्याही अडथळ्याशिवाय आपला व्यवसाय सुरू ठेवता येत होता.

खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; फरार गुंड तुषार हंबीर अखेर पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988, भारतीय दंड संहितेतील गुन्हेगारी कट, फसवणूक आणि बनावटगिरीशी संबंधित कलमे तसेच छत्तीसगड जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. सौरभ चंद्राकर हा या प्रकरणांतील प्रमुख आरोपींपैकी एक आहे. दुसरीकडे, ईडीने या सिंडिकेटशी संबंधित भारतातील आणि परदेशातील अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.

रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ओमानमध्ये अटक

सौरभ चंद्राकरविरोधात जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे रॉयल ओमान पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर सीबीआय आणि ईडीने त्याच्याविरोधात गोळा केलेल्या पुराव्यांसह ओमान सरकारकडे औपचारिक प्रत्यार्पण प्रस्ताव पाठवला.

भारत सरकारच्या विविध तपास यंत्रणा, इंटरपोल आणि ओमानमधील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ओमान सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर सीबीआयचे पथक मस्कत येथे पोहोचले आणि सौरभ चंद्राकरला भारतात घेऊन आले.

या कारवाईत सहकार्य केल्याबद्दल सीबीआयने ओमान सरकार आणि रॉयल ओमान पोलिसांचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीविरोधात दोन्ही देशांमधील सहकार्याचे हे उदाहरण असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

भारतात आणल्यानंतर सौरभ चंद्राकरची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ट्रान्झिट रिमांड मिळाल्यावर त्याला रायपूर येथे नेण्यात येईल. तेथे सीबीआयच्या विशेष न्यायाधीशांसमोर त्याला हजर करण्यात येणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौरभ चंद्राकर कोण आहे?

    Ans: सौरभ चंद्राकर हा महादेव ऑनलाइन बुक या अवैध ऑनलाइन सट्टेबाजी सिंडिकेटचा प्रवर्तक आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे.

  • Que: सौरभ चंद्राकरला भारतात कुठून आणण्यात आले?

    Ans: सीबीआयच्या विशेष पथकाने सौरभ चंद्राकरला ओमानमधून भारतात आणले.

  • Que: सौरभ चंद्राकरला ओमानमध्ये कसे पकडण्यात आले?

    Ans: त्याच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे रॉयल ओमान पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

Web Title: Mahadev app mastermind saurabh chandrakar extradited from oman rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • Bribe
  • CBI
  • saurabh chandrakar

संबंधित बातम्या

Kuno National Park मधील चित्ताचा गोळीबारात मृत्यू? CBI चौकशीची मागणी
1

Kuno National Park मधील चित्ताचा गोळीबारात मृत्यू? CBI चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.