Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीट पेपरफुटी प्रकरणात ‘सीबीआय’ची गुजरातमधील 4 जिल्ह्यांत छापेमारी; एकाला अटक

सीबीआयने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-ग्रॅज्युएट (NEET-UG) पेपर लीक प्रकरणात सहा एफआयआर नोंदवले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 29, 2024 | 12:35 PM
photo credit :Team Navrashtra

photo credit :Team Navrashtra

Follow Us
Close
Follow Us:

गुजरात : नीट पेपर लीक (NEET Paper leak case) प्रकरणी सीबीआयने गुजरातमधील चार जिल्ह्यांसह सात ठिकाणी छापेमारी केल्याची बातमी समोर आली आहे. सीबीआयने आज (२९ जून) सकाळपासून गोध्रा, खेडा, आनंद आणि अहमदाबादसह सात ठिकाणी छापे टाकत कारवाई केल्याची बातमी आहे. NEET पेपर लीकशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर हे छापे टाकले जात आहेत.

दरम्यान हजारीबाग येथील पत्रकार जमालुद्दीन यालाही सीबीआयने अटक केली होती. जमालुद्दीनवर प्राचार्य आणि उपमुख्याध्यापकांना मदत केल्याचा आरोप आहे. जमालुद्दीन हा फोनद्वारे प्राचार्यांशी सतत संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  पेपर लीक प्रकरणात तो प्राचार्य आणि उपमुख्याध्यापकांना मदत करत असल्याची माहिती त्याच्या कॉल डिटेल्स आणि सीबीआयच्या तपासातून समोर आली आहेत.

NEET-UG पेपर लीक प्रकरणी सीबीआयने झारखंडमधील हजारीबाग येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकांना शुक्रवारी अटक केली होती. ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसानुल हक यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे 5 मे रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी हजारीबागचे शहर समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. उपप्राचार्य इम्तियाज आलम यांची एनटीएचे पर्यवेक्षक आणि ओएसिस शाळेचे केंद्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पेपर लीक प्रकरणी सीबीआय जिल्ह्यातील आणखी पाच जणांची चौकशी करत आहे.

सीबीआयने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-ग्रॅज्युएट (NEET-UG) पेपर लीक प्रकरणात सहा एफआयआर नोंदवले आहेत. NTA ने देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये MBBS, BDS, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET-UG परीक्षा आयोजित केली होती. यंदा 5 मे रोजी एकूण 571 शहरांतील 4 हजार 750 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला 23 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते.

दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर NEET पेपर लीक प्रकरणात लातूर आणि बीडमधील आणखी काही शिक्षक पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या संदर्भात लातूर पोलिसांनी बीड येथील दोन शिक्षकांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. सध्या त्याला नोटीस दिल्यानंतर सोडून देण्यात आले असले तरी तो अद्याप संशयाच्या भोवऱ्यात आहे. NEET परीक्षेत 650 पेक्षा जास्त गुण मिळवण्याच्या बदल्यात आरोपीने प्रति विद्यार्थी 5 लाख रुपयांची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र सुरुवातीला ५० हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून घेण्यात आले. 14 पैकी एकाही विद्यार्थ्याला 600 पेक्षा जास्त गुण मिळाले नसल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. त्यामुळे काही रक्कमही परत झाली.

Web Title: Cbi raids in 4 districts of gujarat in neat paper leak case one arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 12:35 PM

Topics:  

  • Gujrat
  • maharashtra
  • NEET Exam
  • political news

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.