Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News : ७ पालिकांची निवडणूक संकटात; अमरावतीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ठरल्याचा परिणाम

Amravati News Marathi : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका सध्या सुरू असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. परंतु अमरावती विभागातील सात नगर परिषद, नगर पंचायतींचे भवितव्य अंधारात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 20, 2025 | 12:10 PM
७ पालिकांची निवडणूक संकटात; अमरावतीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ठरल्याचा परिणाम (फोटो सौजन्य-X)

७ पालिकांची निवडणूक संकटात; अमरावतीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण ठरल्याचा परिणाम (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका धोक्यात
  • अमरावती विभागातील सात नगर परिषद
  • आरक्षण ५० टक्क्यांवरून जास्त झाले आहे
अमरावती: अमरावती विभागातील दर्यापूर, चिखलदरा नगर परिषद आणि धारणी नगर पंचायतीसह सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका धोक्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के आरक्षण मर्यादा न ओलांडण्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, या ठिकाणी आरक्षण मर्यादा वाढल्याचे उघड झाल्याने निवडणुका रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका सध्या सुरू असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

परंतु अमरावती विभागातील सात नगर परिषद, नगर पंचायतींचे भवितव्य अंधारात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी आरक्षण ५० टक्क्यांवरून जास्त झाले आहे, त्या ठिकाणच्या निवडणुका रद्द होण्याची शक्यता आहे. या यादीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, चिखलदरा नगरपरिषद, धारणी नगरपंचायत, यवतमाळ जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा तसेच वाशिम जिल्ह्यातील एक नगरपरिषदेचा समावेश आहे.

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

५० टक्क्यांच्या पुढे: दर्यापूर नगरपरिषदेत, ओबीसींचे प्रमाण ६.७५ टक्के धरून ७ जागा राखीव ठेवल्याने एकूण आरक्षण ६४.७१ टक्के झाले आहे. चिखलदरा नगरपरिषदेत, एसटी आरक्षण थेट ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यात आले आहे. मागील निवडणुकीत एसटीसाठी ३ जागा राखीच होत्या; यावेळी त्या ७ करण्यात आल्या. यात ओबीसी जागा ४ वरून ५ तर एससी जागा २ वरून ३ करण्यात आली आहे. धारणी नगरपंचायतीत, ओबीसीसाठी ४.५९ टक्केवारीच्या आधारे ५ जागा राखीव ठेवल्याने एकूण आरक्षण ६४.७१ टक्के झाले आहे.

चक्राकार आरक्षणामुळे पेच निर्माण

नगर पालिका, नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी वापरला नगराध्यक्ष फाम्र्म्युला जातो. आरक्षण चक्राकार असून अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला), इतर मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय (महिला), सामान्य नंतर सामान्य (महिला) असा असते. हे क्रमवार फिरते पद्धतनं असते. समजा एक नगरपालिकेत २० जागा असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणे अनुसूचित जाती १० टक्के, अनुसूचित जमाती ५ टक्के, इतर मागासवर्गीय २७ टक्के तर सामान्यची उर्वरित जागा राहील. त्या फार्मूल्यानुसार अनुसूचित जातीसाठी २ जागा, अनुसूचित जमाती साठी १ जागा, ओबीसीसाठी ५ जागा तर सामान्यसाठी १२ जागा राहिल. या सर्वांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव म्हणजे १० जागा. (वर्गानुसार विभागल्या जातात).

“हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यामुळे यावर भाष्य करता वेगार नाही, अद्यापपर्यंत राज्य नगर पंवायत निवडणुकीच्या अनुषंगाने मिळालेल्या निर्देशानुसार अमंलबजावणी सुरु आहे. राज्य आयोगाकडून जे निर्देश प्राप्त होईल, त्याप्रमाणे कार्यवाही होईल असं मतं अमरावतीचे नगर पालिका प्रशासन, सहआयुक्त, विकास खंबारे यांनी व्यक्त केलं आहे.

शेकोट्या पेटल्या; तापमानात घसरण! चिखलदऱ्यात धुक्याची चादर; ग्रामीण भागात वाढला थंडीचा कडाका

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रात कधी होणार निवडणुका?

    Ans: राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.

  • Que: महापालिका निवडणुका कधी लागणार ?

    Ans: ३१ जानेवारीच्या आधी महापालिका निवडणुका होतील, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. डिसेंबर अखेरीस आयोगाकडून राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक एकाचवेळी होणार असल्याचे समजतेय.

  • Que: निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किती?

    Ans: महापालिका - 29, नगरपालिका - 246, नगरपंचायती - 42, जिल्हा परिषद - 32, पंचायत समिती - 336

Web Title: Elections in 7 municipalities in crisis and impact of more than 50 percent reservation in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • amravati
  • maharashtra
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Tulja Bhavani Temple विकास आराखड्याच्या ५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता
1

Tulja Bhavani Temple विकास आराखड्याच्या ५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता

Nylon Manja Ban : आता पतंग उडविणे पडणार महागात! मांजाचा वापर आणि विक्रीवर होणार कारवाई
2

Nylon Manja Ban : आता पतंग उडविणे पडणार महागात! मांजाचा वापर आणि विक्रीवर होणार कारवाई

Malegaon Election : मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम
3

Malegaon Election : मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू
4

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.