Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदेडमध्ये निवडणुकीची रणधुमाळी! ७ नगराध्यक्षपदासाठी ११७ तर १६५ नगरसेवक पदासाठी १ हजार २१० अर्ज

परभणीमध्ये सात नगर नालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नगराध्यक्षपदासाठी ११७ तर नगरसेवक पदासाठी १ हजार २१० अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 19, 2025 | 06:09 PM
Hundreds of candidates in fray for seven Gram Panchayat elections in Parbhani elections

Hundreds of candidates in fray for seven Gram Panchayat elections in Parbhani elections

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Local Body Elections: परभणी : जिल्ह्यातील जिंतूर, पलू, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, पूर्णा या सात नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून नगराध्यक्षपदासाठी ११७ तर नगरसेवक पदासाठी १ हजार २१० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ७ नगराध्यक्ष आणि १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. जिल्ह्यात केवळ पूर्णा व गंगाखेड नगर पालिकेत चौरंगी लढत होणार असून इतर ठिकाणी तिरंगी, दुरंगी लढती रंगण्याची चिन्हे दाखल उमेदवारीवरून दिसत आहेत.

अपक्षांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले असले तरीही त्यात दिग्गज उमेदवारांचा समावेश नाही. युती, आघाडी होण्याची वाट पाहण्यात जिल्ह्यात सर्वच पालिकांमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय उत्सुकता ताणली गेल्याचे पहायला मिळाले. शेवटी यामध्ये भाजप व एकनाथ शंदे यांच्या शिवसेनेने काही ठिकाणी एकमेकांशी युती केली. मात्र उबाठा शिवसेना व राष्ट्रवादी शरद पवार गटाचा काँग्रेससोबत समन्वय दिसून आला नाही. त्यामुळे या दोन पक्षांना अनेक ठिकाणी उमेदवार देतानाही अडचण झाली, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाथरी विधानसभा वगळता इतरत्र सोयीनुसार भूमिका घेतल्याचे पहावयास मिळाले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रमुख समभागांचा आढावा

गंगाखेडात आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेना शहर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे अर्ज भरण्यासाठी शक्त्ती प्रदर्शन करण्यात आले. सोनपेठ येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करून नगर पालिकेसाठी अर्ज दाखल करण्यात आले.

सर्वच पक्षांत सर्वांनाच उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने काही जणांनी इतर पक्षाकडून उमेदवारी भरण्यापेक्षा अपक्ष म्हणून अर्ज भरला. यामुळे सध्या असलेल्या सहा प्रमुख पक्षांकडे उमेदवारांची गर्दी होईल असे वाटले होते, परंतु तसे झालेले नाही. दुसऱ्या पक्षाचा सहारा घेण्यापेक्षा अपक्ष म्हणून लढण्यालाच पसंती दिली जात आहे. पक्षाचे नाव टाकून अर्ज न भरल्याने अशांना आता ऐनवेळी पक्षाकडून उमेदवारीही घेता येणे शक्य होणार नाही.

पायरीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेस व शिंदेसेनेच्या लढतीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने उडी घेतल्याने तिरंगी लढत होणार आहे.
जिल्ह्यात प्रमुख पक्षाची माघार कुठे होईल, याची शक्यता नसली तरीही जेथे आघाडी व युतीची बोलणी ठरली अशा ठिकाणी मात्र माघारी दिसतील. इतरत्र फक्त अडचणीचा ठरेल, अशा अपक्षांनाच माघारीसाठी गळ घातली जाईल, असे चित्र आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

गुट्टेच्या आघाडीला आव्हान

परभणी जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत प्रमुख राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या अर्जानुसार दुरंगी, तिरंगी लढतीचीच चिन्हे आहेत. गंगाखेडात मात्र आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेनेच्या आघाडीसमोर काँग्रेस, भाजपसह राकाँ अजित पवार गटही लढतीत आहे. त्यामुळे या एकाच ठिकाणी चौरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत. असाच प्रकार पूर्णा पालिकेतही असून उद्ध‌वसेना, काँग्रेस व शिंदेसेनेचा उमेदवार गुट्टेच्या आघाडीला आव्हान देईल.

जिंतूरमध्ये भाजप व राष्ट्र‌वादी अजित पवार गट या पारंपरिक स्वरूपाच्या पालकमंत्री मेधना बोर्डीकर व माजी आमदार विजय भांबळे यांच्यातील लढतीत ऐनवेळी काँग्रेसने उडी घेतली आहे. याठिकाणी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मुस्लिम उमेदवार दिला आहे. सोनपेठला आमदार राजेश विटेकर यांच्या राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय एकत्रित येण्याचे संकेत आहेत. तर मानवतलाही तीच स्थिती असून येथे मात्र भाजपने शिंदेसेनेच्या मागे बळ उभे केले.

Web Title: Hundreds of candidates in fray for seven gram panchayat elections in parbhani elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Nanded
  • political news

संबंधित बातम्या

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर
1

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला
2

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Pune News : उमेदवारांनो ‘हा’ फॉर्म्युला वापरा अन् विजयी व्हा! अजित पवारांचा पुणे पॅटर्न; विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र
3

Pune News : उमेदवारांनो ‘हा’ फॉर्म्युला वापरा अन् विजयी व्हा! अजित पवारांचा पुणे पॅटर्न; विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ
4

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.