Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सबका हिसाब होगा! पहलगाम हल्ल्यानंतर अमित शाह आक्रमक; म्हणाले, “देशाला आश्वासन देतो की…”

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई, दिल्ली आणि देशातील महत्वाच्या शहरांसह कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2025 | 06:13 PM
सबका हिसाब होगा! पहलगाम हल्ल्यानंतर अमित शाह आक्रमक; म्हणाले, “देशाला आश्वासन देतो की…”
Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर: पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे.  हल्ल्याची माहिती कळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काश्मीरला रवाना झाले. आज त्यांनी पहलगाममध्ये पाहणी केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना सज्जड इशारा दिला आहे.

काल पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले. त्यानंतर त्यांनी काही महत्वाच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पहलगाममध्ये हल्ला झालेल्या घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पीडित कुटुंबाची, जखमी लोकांची त्यांनी भेट घेतली. यावेळेस त्यांनी या भ्याड हल्ल्यावरून दहशतवाद्यांना गर्भित इशारा दिला आहे.

अमित शहांचे ट्वीट काय?

पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ल्यात आपल्या लोकांना गमावण्याचे दु:ख आहे. हे दु:ख शब्दात व्यक्त करता येणार नाही. मी या सर्व कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला आश्वासन देतो की निष्पाप लोकांना मारणाऱ्या या दहशतवाद्यांना अजिबात सोडले जाणार नाही.

पहलगाम के आतंकी हमले में अपनों को खोने का दर्द हर भारतीय को है। इस दुःख को शब्दों में व्यक्त नहीं किया जा सकता। मैं अपने इन सभी परिवारों और पूरे देश को विश्वास दिलाता हूँ कि बेगुनाह मासूम लोगों को मारने वाले इन आतंकियों को बिल्कुल बख्शा नहीं जाएगा। pic.twitter.com/Dwkt6Hhj7P — Amit Shah (@AmitShah) April 23, 2025

किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना?

काल पहलगाम येथे सैनिकी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काही पर्यटक महाराष्ट्रातील देखील या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टिआरएफने स्वीकारली आहे. टीआरएफ (द रेजिडेंट फ्रंट) ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचे मानले जाते. दरम्यान या दहशतवादी संघटनेबद्दल जाणून घेऊयात.

इंडियन मुजाउद्दीन आणि लष्कर ए तोयबा यांच्यामधून टीआरएफ दहशतवादी संघटना तयार करण्यात आली आहे. या संघटनेचे काम काश्मीरमधील युवकांना सीमारेषेच्या पलीकडे पाठवून त्यांना गोरील्ला लढाईचे ट्रेनिंग देणे हे आहे. टीआरएफच्या संस्थापकांमध्ये हाफिज मुहम्मद सईद, झकीउर रहमान लखवी आणि काश्मीरचे रहिवासी शेख सज्जाद गुल यांचा समावेश आहे.

Pahalgam Terror Attack: किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना? दहशतवाद्यांचे लादेन कनेक्शन? वाचा सविस्तर…

दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई, दिल्ली आणि देशातील महत्वाच्या शहरांसह कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे. महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पुण्यात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

 

Web Title: Central home minister amit shah warn to terrorist grous after pahalgam attack jammu kashmir news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 06:13 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले
1

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान
2

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?
3

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
4

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.