Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी घेतली भेट; ‘या’ मुद्यांवर झाली चर्चा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांच्या विकासावर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 15, 2024 | 07:45 AM
Shinde-Naidu_1

Shinde-Naidu_1

Follow Us
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात अनेक घडामोडी होताना दिसत आहे. त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्थेसह विविध क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांच्या विकासावर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.

#मुंबई | मुख्यमंत्री @mieknathshinde यांची आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांच्या विकासावर… pic.twitter.com/3GYny25Uoc — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 14, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सुमारे अर्धा तास चर्चा केली. दोन्ही राज्यांमधील सामाजिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्य यावरही शिंदे आणि नायडू यांनी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी पायाभूत सुविधांचा विकास आणि डिजिटल क्षेत्रातील संधींच्या विस्ताराशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा केली. शिंदे यांचा पक्ष शिवसेना आणि नायडूंचा टीडीपी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग आहे.

Web Title: Chandrababu naidu meet cm eknath shinde on sunday in mumbai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2024 | 07:45 AM

Topics:  

  • Chandrababu Naidu
  • Cm Eknath Shinde
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.