Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांद्रयान-3 आज पोहोचणार चंद्राच्या जवळ; 23 ऑगस्टला होणार यशस्वी लँडिंग

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला चांद्रयान-3 (Chandrayaan 3) चे यशस्वी प्रक्षेपण केलं. हे यान आज 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 16, 2023 | 07:35 AM
चांद्रयान-3 आज पोहोचणार चंद्राच्या जवळ; 23 ऑगस्टला होणार यशस्वी लँडिंग
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला चांद्रयान-3 (Chandrayaan 3) चे यशस्वी प्रक्षेपण केलं. हे यान आज 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून या यानाचे प्रक्षेपण झालं होतं. आता हे यान आज चंद्राच्या जवळ पोहोचणार असल्याचे सांगितले जात आहे.

चंद्राच्या 100 किमी X 100 किमी वर्तुळाकार कक्षेत आणणार आहे. यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ सकाळी साडेआठ वाजता काही काळ वाहनाचे थ्रस्टर्स फायर करतील. सध्या चांद्रयान 150 किमी x 177 किमीच्या कक्षेत आहे. 17 ऑगस्ट हा चांद्रयानसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी इस्रो चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे करेल.

चांद्रयान-3 ने आतापर्यंत चांगला प्रवास केला आहे. 14 जुलैला चांद्रयान 3 हे यान 170 किमी x 36,500 किमीच्या पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि 14 दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्रावरील पाण्याचा शोध घेणार आहे. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे देखील कळेल. 22 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.15 च्या सुमारास चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे.

चांद्रयान पहिल्यांदा चंद्राच्या कक्षेत दाखल झाले तेव्हा त्याची कक्षा 164 किमी x 18,074 किमी होती. कक्षेत प्रवेश करताना त्याच्या ऑनबोर्ड कॅमेऱ्यांनी चंद्राची छायाचित्रेही टिपली. इस्रोने त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे. या चित्रांमध्ये चंद्राचे खड्डे स्पष्टपणे दिसत आहेत.

Web Title: Chandrayaan 3 will reach near moon today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2023 | 07:35 AM

Topics:  

  • Chandrayaan 3
  • ISRO
  • mission

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.