
देशभरातील अनेक एअरपोर्टसवर चेक-इन सिस्टिम प्रभावित
बंगळुरू एअरपोर्टवरील 42 उड्डाणे रद्द
अनेक एअरपोर्टवर प्रवाशांचा मोठा खोळंबा
देशभरातील विमानतळांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, देशातील अनेक एअरपोर्ट्सवर चेक-इन सिस्टिम प्रभावित झाली आहे. त्यामुळे एअरपोर्टसवर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचे दिसून आले. चेक -इन सिस्टिम प्रभावित झाल्याने अनेक विमानांच्या उड्डाणावर परिणाम झाला. बंगळुरू एअरपोर्टवरून तब्बल 42 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान कालच बंगळुरू एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे हा सायबर अटॅक तर नाही ना, असा देखील संशय व्यक्त केला जात आहे.
चेक इन सिस्टिम प्रभावित झाल्याचा परिणाम हा हैदराबाद, बेंगलोर, दिल्ली आणि अन्य काही एअरपोर्टसवर दिसून आला. काही काळाने दिल्ली एअरपोर्टवर चेक इन प्रक्रिया मॅन्यूअल करण्यात आली.मायक्रोसॉफ्ट विंडोज च्या जागतिक आउटेजमुळे चेक इन सिस्टिम प्रभावित झाल्याचे प्रवाशांना वाराणसी एअरपोर्टवर सांगण्यात आले.
देश के कई एयरपोर्ट में बुधवार सुबह से चेक इन सिस्टम में दिक्कत आ रही है। इससे फ्लाइट ऑपरेशन प्रभावित हुआ है। बेंगलुरु एयरपोर्ट में 42 फ्लाइट को कैंसिल करना पड़ा। वहीं, हैदराबाद में एयरपोर्ट पर भारी भीड़ जमा हो गई। दिल्ली में चेक इन प्रोसेस को मैन्युअल कर दिया गया है। वाराणसी… pic.twitter.com/VmlFTpLYC6 — Rajesh Sahu (@askrajeshsahu) December 3, 2025
दरम्यान मायक्रोसॉफ्टने हा दावा खोडून काढला आहे. विंडोजमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नसल्याचे स्पष्ट केले. चेक – इन सिस्टिम प्रभावित झाल्यामुळे दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, वाराणसी आणि अन्य एअरपोर्टवर प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे दिसून आले.
दिल्ली नंतर Bengaluru टार्गेटवर?
दिल्ली बॉम्ब स्फोटाची घटना ताजी असतानाच देशातील प्रगत शहर म्हणून ओळख असलेल्या बेंगळुरू शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू शहर पोलिस आयुक्तांना धमकीचा ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, मॉल्स बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. बंगळुरू शहरात महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दिल्ली नंतर Bengaluru टार्गेटवर? जैश-ए-मोहम्मदकडून एअरपोर्ट अन् ‘या’ ठिकाणांना बॉम्ब ब्लास्टची धमकी
दरम्यान हा ईमेल 30 तारखेला पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ईमेलवर प्राप्त झाला. यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या ईमेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या ईमेलमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या व्हाईट कॉलर टेरर टीमकडून एक चेतावणी आहे, आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ, ओरियन मॉल, लुलू मॉल, फोरम साऊथ मॉल ही ठिकाणे बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी निश्चित केली आहेत.
असा ईमेल प्राप्त होताच याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईमेल पाठविणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. हा धमकीचा ईमेल बंगळुरू शहर पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ईमेल आयडीवर प्राप्त झाला. त्यानंतर वेगाने सूत्र फिरवली गेली आणि या सर्व ठिकाणी आणि अन्य महत्वाच्या ठिकाण सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. दिल्लीत स्फोट झाल्यानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.