बेंगळुरू एअरपोर्ट उडवण्याची धमकी (फोटो- istockphoto)
जैश-ए-मोहम्मदकडून बेंगळुरू एअरपोर्ट उडवण्याची धमकी
बेंगळुरू शहर पोलिस आयुक्तांना आला ई-मेल
संवेदनशील ठिकाणी वाढवण्यात आली सुरक्षा
दिल्ली बॉम्ब स्फोटाची घटना ताजी असतानाच देशातील प्रगत शहर म्हणून ओळख असलेल्या बेंगळुरू शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू शहर पोलिस आयुक्तांना धमकीचा ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, मॉल्स बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. बंगळुरू शहरात महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दरम्यान हा ईमेल 30 तारखेला पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ईमेलवर प्राप्त झाला. यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या ईमेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या ईमेलमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या व्हाईट कॉलर टेरर टीमकडून एक चेतावणी आहे, आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ, ओरियन मॉल, लुलू मॉल, फोरम साऊथ मॉल ही ठिकाणे बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी निश्चित केली आहेत.
मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी थेट बंगळूरु मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी; अधिकारी देखील चक्रावले
असा ईमेल प्राप्त होताच याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईमेल पाठविणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. हा धमकीचा ईमेल बंगळुरू शहर पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ईमेल आयडीवर प्राप्त झाला. त्यानंतर वेगाने सूत्र फिरवली गेली आणि या सर्व ठिकाणी आणि अन्य महत्वाच्या ठिकाण सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. दिल्लीत स्फोट झाल्यानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
कुवेत-हैदराबाद इंडिगो विमानात मानवी बॉम्बची धमकी
कुवेतहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला विमानात “मानवी बॉम्ब” असल्याची धमकी मिळाल्यानंतर विमानाची मुंबई विमानतळावर आत्पकालीन लॅंडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने धोका लक्षात घेता पाललटने मुंबई विमानतळावर विमानाचे आत्पातकालीन लॅंडिग केले.
Indigo Flight Human Bomb Threat: कुवेत-हैदराबाद इंडिगो विमानात मानवी बॉम्बची धमकी; मुंबईत आपत्कालीन लँडिंग
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुवैतहुन हैदराबादला निघालेल्या इंडिगोच्या विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकीचा मेल दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. या मेलमध्ये विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकी नमुद करण्यात आली होती. जी अधिकाऱ्यांना अत्यंत संवेदनशील वाटत होती. मेल मिळताच विमानतळ अधिकारी ताबडतोब सतर्क झाले. अधिकाऱ्यांनी पायलटला विमानाचे मुंबई विमानतळावरच लँडिग करण्यास सांगितले. टेकऑफनंतर लगेचच या धमकीमुळे विमान मुंबईकडे वळवण्यात आले. विमानाचे आपात्कालीन लँडिंग होईपर्यंत विमानतळ अधिकाऱ्यांनी आधीच सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या होत्या. आपत्कालीन प्रतिसाद पथकांसह सुरक्षा दल पूर्णपणे तैनात करण्यात आले.






