Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये ट्रक-बोलेरोचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू तर 5 जखमी
सरगुजा: छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघात झाला आहे. तर या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त र 5 जण जखमी झाले आहेत. माहितीनुसार, सरगुजा जिल्ह्यातील सितापूर या भागात राष्ट्रीय महामार्ग 43 वर ही भीषण घटना घडली आहे. या ठिकाणी ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात झाला. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक वेगाने येणारी बोलेरो आणि ट्रकची भीषण धडक झाली. यामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. टर 5 जण जखमी झाले आहेत. रेवापूर-सखौली गावातील ग्रामस्थ महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी बोलेरो गाडीने जवळच्या किलकिला शिव मंदिरात गेले होते. तो त्याच्या गावी परतत असताना, विष्णुपूर गावाजवळ त्याची गाडी एका ट्रकला धडकली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. ट्रकचा चालक घटना घडताच फरार झाला आहे. तयाचा देखील तपास सुरू आहे.
ड्रायव्हरच्या जागेवर कंडक्टर बसला; बस रेस केली अन् …; 3 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमध्ये एका बसने अनेक लोकांना चिरडले आहे. गाझीयाबादच्या राष्ट्रीय महामार्गवार असणाऱ्या मसूरी बस स्टँडवर मेट्रो इलेक्ट्रिक बसने 6 पेक्षा जास्त लोकांना चिरडले आहे. ही घटना घडताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले आहे.
या घटनेत जखमी झालेल्या सर्व लोकांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकांना चिरडल्यानंतर बस कंडक्टर तिथून फरार झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये ड्रायव्हर नव्हता. त्याच्या जागेवर कंडक्टर बसलेला होता. तो अचानक बस रेस सुरू करू लागला. त्यामुळे हा अपघात झाला. त्यानंतर कंडक्टर घटनास्थळावरून पळून गेला आहे. कंडक्टरने केलेल्या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तर यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच फरार कंडक्टरचा देखील मोठ्या वेगाने शोध सुरू करण्यात आला आहे.
महाकुंभला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. लाखों भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. दरम्यान प्रयागराजमध्ये एक भीषण अपघात घडली आहे. बोलेरो गाडी आणि बसची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. टर 19 प्रवाशी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी बोलेरोमधून प्रवास करत होते.
प्रयागराज- मिर्झापुर हायवेवर बोलेरो आणि बसचा भीषण अपघात झाला. छत्तीसगडमधील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजच्या दिशेने चालले होते. मात्र काळाने त्यांच्यावर महाकुंभला जाण्याआधीच घाला घातला आहे. यामध्ये 19 प्रवासी जखमी झाले आहेत. हे 19 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी मध्यप्रदेशमधील राजगड जिल्ह्यात राहणारे प्रवासी होते.अपघाताची माहिती कळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाईस सुरुवात केली. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.