गाझियाबादमध्ये बसने लोकांना चिरडले (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
Bus Crush Passengers: उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमध्ये एका बसने अनेक लोकांना चिरडले आहे. गाझीयाबादच्या राष्ट्रीय महामार्गवार असणाऱ्या मसूरी बस स्टँडवर मेट्रो इलेक्ट्रिक बसने 6 पेक्षा जास्त लोकांना चिरडले आहे. ही घटना घडताच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले आहे.
या घटनेत जखमी झालेल्या सर्व लोकांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकांना चिरडल्यानंतर बस कंडक्टर तिथून फरार झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये ड्रायव्हर नव्हता. त्याच्या जागेवर कंडक्टर बसलेला होता. तो अचानक बस रेस सुरू करू लागला. त्यामुळे हा अपघात झाला. त्यानंतर कंडक्टर घटनास्थळावरून पळून गेला आहे.
कंडक्टरने केलेल्या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तर यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच फरार कंडक्टरचा देखील मोठ्या वेगाने शोध सुरू करण्यात आला आहे.
महाकुंभला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. लाखों भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. दरम्यान प्रयागराजमध्ये एक भीषण अपघात घडली आहे. बोलेरो गाडी आणि बसची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. टर 19 प्रवाशी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी बोलेरोमधून प्रवास करत होते.
प्रयागराज- मिर्झापुर हायवेवर बोलेरो आणि बसचा भीषण अपघात झाला. छत्तीसगडमधील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजच्या दिशेने चालले होते. मात्र काळाने त्यांच्यावर महाकुंभला जाण्याआधीच घाला घातला आहे. यामध्ये 19 प्रवासी जखमी झाले आहेत. हे 19 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी मध्यप्रदेशमधील राजगड जिल्ह्यात राहणारे प्रवासी होते.अपघाताची माहिती कळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाईस सुरुवात केली. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा: Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी
समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. या महामार्गावर सिन्नरजवळ एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारचा ताबा सुटल्याने ती साईड अँगलला धडकली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी रत्नागिरी येथील असून, ते प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला आणि देवदर्शनासाठी गेले होते. समृद्धी महामार्गाने परतत असताना त्यांना हा दुर्दैवी अपघात झाला.