Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest : दिल्ली राडा होणार! आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची 35 हजारांची फौज तैनात; CCTV, ड्रोन आणि FRS चा करणार वापर

CJP Protest : CJP च्या १० ऑक्टोबरच्या जंतर-मंतर आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ३५ हजारांहून अधिक जवान तैनात होण्याची शक्यता असून सीसीटीव्ही, ड्रोन आणि FRS चा वापर केला जाणार आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 09:58 PM
Delhi Police depolyed Jantar mantar

Delhi Police depolyed Jantar mantar

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीत ३५ हजारांहून अधिक जवान तैनात होण्याची शक्यता.
  • दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं केलं स्पष्ट
  • सीसीटीव्ही, चेहरा ओळख प्रणाली, ड्रोन आणि इमारतींच्या छतांवरील निरीक्षक तैनात
 

CJP Protest : दिल्लीत उद्या (10 ऑकटोबर) कॉक्रोच जनता पार्टीकडून जोरदार आंदोलन पार पडणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात रान उठलेले असतानाच आता जंतर मंतर येथे आंदोलकांनी मोर्चा वळवला आहे. दिल्ली पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी दिली नसून जोरदार बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे. राजधानीत दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे 35 हजाराहून अधिक जवान तैनात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आपल्या पथकांना विशेष सूचना दिल्याचं वृत्त आहे. निदर्शनांचा प्रयत्न करणाऱ्यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तैनातीच्या नियोजनासंदर्भात संबंधित संचालनालयांनाही पत्रं पाठवण्यात आली आहेत.

पोलिसांना शस्त्रांबाबत आणि वर्तनाबाबत सूचना

उपलब्ध माहितीनुसार, आंदोलनाच्या वेळी तैनात होणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPF) तुकड्यांना शस्त्रं न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचवेळी पोलीस पथकांना लाठ्या किंवा बॅटन बाळगण्याची परवानगी असेल.

New Delhi : दिल्लीत इंटरनेट गुल्लं, मेट्रो सेवा मात्र कायम, गृहमंत्रायलयाने घेतला सीजेपीचा धसका

निदर्शकांशी शाब्दिक वाद घालू नये, अशा सूचनाही देण्यात आल्याचं वृत्त आहे. पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारित करण्याचे कथित प्रयत्न होऊ शकतात, अशी शक्यता या सूचनांमागे असल्याचं सांगण्यात येत आहे.

सहा ठिकाणी स्थानबद्धता केंद्रांची व्यवस्था

आंदोलनादरम्यान निदर्शकांना ताब्यात घेतल्यास त्यांना सहा निश्चित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये छत्रसाल स्टेडियम, राजीव गांधी स्टेडियम, यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सूरजमल स्टेडियम, कम्युनिटी सेंटर दौलतपूर आणि कम्युनिटी सेंटर पांड्रावल यांचा समावेश आहे.

याशिवाय उत्तर प्रदेश आणि हरियाणातून अतिरिक्त महिला पोलीस कर्मचारीही बोलावण्यात आल्याची माहिती आहे.

CCTV, ड्रोन आणि चेहरा ओळख प्रणालीद्वारे नजर

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीमध्ये अनेक फेशियल रेकग्निशन सिस्टिम्स (FRS), अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. काही इमारतींच्या छतांवर निरीक्षक तैनात करून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचीही तयारी आहे.

या आंदोलनात विद्यार्थी संघटना आणि विविध राजकीय गट सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडून बंदोबस्ताचं नियोजन केलं जात आहे.

दरम्यान, CJP ने जाहीर केलेल्या आंदोलनाला परवानगी नसल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आंदोलनाच्या दिवशी प्रत्यक्षात किती जवान तैनात केले जातात आणि परिस्थिती कशी राहते, याकडे लक्ष लागलं आहे.

CJP Protest : दिल्ली पोलिसांचा CJP ला झटका! आंदोलनाची परवानगी नाकारली, केंद्राने सर्व राज्यांना दिले महत्वाचे निर्देश

💡

Frequently Asked Questions

  • Que: CJP ने दिल्लीमध्ये आंदोलन कधी आणि कुठे जाहीर केलं आहे?

    Ans: कॉकरोच जनता पार्टीने १० ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतरकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

  • Que: आंदोलनासाठी किती जवान तैनात होण्याची शक्यता आहे?

    Ans: उपलब्ध माहितीनुसार, दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे ३५ हजारांहून अधिक जवान तैनात होण्याची शक्यता आहे. हा संभाव्य आकडा असून प्रत्यक्ष तैनातीची अधिकृत पुष्टी वेगळी असू शकते.

  • Que: आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी कोणती सुरक्षा व्यवस्था केली आहे?

    Ans: सीसीटीव्ही कॅमेरे, चेहरा ओळख प्रणाली, ड्रोन आणि इमारतींच्या छतांवरील निरीक्षकांच्या माध्यमातून नजर ठेवण्याची तयारी आहे. ताब्यात घेतलेल्या निदर्शकांना हलवण्यासाठी सहा निश्चित केंद्रांची व्यवस्थाही करण्यात आल्याचं वृत्त आहे.

Web Title: Cjp protest delhi jantar mantar security deployment october 10 vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • CJP
  • CJP Protest
  • Delhi Police

संबंधित बातम्या

CJP Protest : दिल्ली पोलिसांचा CJP ला झटका! आंदोलनाची परवानगी नाकारली, केंद्राने सर्व राज्यांना दिले महत्वाचे निर्देश
1

CJP Protest : दिल्ली पोलिसांचा CJP ला झटका! आंदोलनाची परवानगी नाकारली, केंद्राने सर्व राज्यांना दिले महत्वाचे निर्देश

Abhijeet Dipke Criticized Central Govt. : एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा…; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला
2

Abhijeet Dipke Criticized Central Govt. : एवढी भिती वाटत असेल तर आख्खा देश बंद करा…; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारवर हल्ला

Railways Cancel Express Trains: केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक! सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द
3

Railways Cancel Express Trains: केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक! सीजेपीच्या आंदोलनापूर्वी दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
4

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.