Dhirendra Shastri's big revelation
नागपूर : बहुचर्चित बागेश्वर धाम बाबाला नागपूर पोलिसांकडून दिलासा मिळाला आहे. नागपूर पोलिसांनी बागेश्वर धाम बाबाला (Bageshwar Dham ) क्लीन चिट दिली आहे. 5 ते 11 जानेवारी या कालावधीत नागपुरात बागेश्वर धाम बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान बाबावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी तपासानंतर आता नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) बाबाला क्लीन चिट दिली आहे. बाबांवर हे आरोप श्याम मानव यांनी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ते पूर्णपणे निराधार आहेत. बाबांनी त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप सिद्ध होऊ शकेल, असे कोणतेही काम केले नसल्याचे आम्हाला तपासात आढळून आले.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावरील आरोपांबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम 5 ते 11 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या कार्यक्रमाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची पडताळण्यात आली. यामध्ये त्यांच्याकडून कोणतीही अंधश्रद्धा पसरवली जात नसल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलो आहोत. तसेच, औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही.
बाबा बागेश्वर म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांच वय अवघे २६ वर्षे आहे. त्यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर गार्हा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव सरोज गर्ग आहे. त्यांचे वडील रामकृपाल गर्ग गावातच सत्यनारायणाची कथावाचन करत होते. तर कधी कधी धीरेंद्र शास्त्रीही वडिलांसोबत कथा सांगण्ययास जात होते. त्यांच्या घरी दुध विक्रीचा व्यवसाय आहे. धीरेंद्र कृष्ण यांनी इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण घेतले. वडिलांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी कथा वाचन करण्यास सुरुवात केल्याचाृ त्यांनी सांगितसं,
बागेश्वर महाराज नागपूर येथे प्रवचन करण्यासाठी आले असता त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आरोप केला होता तसेच यांच्या चमत्कारिक शक्तीं सिध्द करण्याच आव्हान दिलं होतं. अन्यथा त्यांच्याविरुद्ध पोलीस एफआयआर दाखल करण्यात येईल, असंही समितीने म्हटलं होतं. त्यांनतर ते कथा कार्यक्रम पुर्ण होण्यापुर्वीच तिथून निघून गेले होते. तेव्हापासून ते वादात आले आहेत.