उत्तरखंडमध्ये पुन्हा ढगफुटी; नंदनगरमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरे पूर्णत: उद्ध्वस्त, सात जण बेपत्ता
चमोली : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यात उत्तरखंडमध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ढगफुटी झाली. चमोलीतील नगरपंचायत नंदनगरच्या कुंतारी लगफली वॉर्डमध्ये ढगफुटीमुळे सहा इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. यामध्ये सात जण बेपत्ता आहेत आणि दोघांना वाचवण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
उत्तराखंडच्या धुर्मा गावातही मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान झाले. देहरादून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना गुरुवारी सुट्टी देण्यात आली. चमोली जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी याबाबतची माहिती दिली. बुधवारी रात्री चामोली जिल्ह्यातील नंदनगर घाट परिसरात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. नंदनगरच्या कुंतारी लगफली वॉर्डमधील सहा घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. यात सात जण बेपत्ता आहेत, तर दोघांना वाचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | Uttarakhand | Chamoli District Magistrate Sandeep Tiwari told ANI, "A cloudburst caused damage in the Nandanagar Ghat area of Chamoli district on Wednesday night. Six houses were buried under debris in the Kuntri Langafali ward of Nandanagar. The District Magistrate… pic.twitter.com/oNWiRwzxYw
— ANI (@ANI) September 18, 2025
दरम्यान, एसडीआरएफची टीम नंदप्रयागला पोहोचली आहे आणि एनडीआरएफची टीम गोचरला नंदप्रयागला रवाना झाली आहे. याबाबत सीएमओने माहिती दिली की, एक वैद्यकीय पथक आणि तीन 108 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. नंदनगर तहसीलमधील धुरमा गावातही मुसळधार पावसामुळे चार-पाच इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. मोक्ष नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
देहरादूनच्या सहस्रधारा परिसरात ढगफुटी
देहरादूनच्या सहस्रधारा परिसरात सोमवारी रात्री उशिरा ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या या ढगफुटीमुळे मुख्य बाजारात ढिगारा पडल्याने दोन ते तीन मोठी हॉटेल्स आणि अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे.
हेदेखील वाचा : Heavy Rain Alert: पावसाचा ‘या’ राज्यांमध्ये कहर; IMD च्या इशाऱ्याने वाढली चिंता, उत्तराखंडमध्ये तर…