Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी; CM फडणवीस, मंत्री बावनकुळेंकडून शोक व्यक्त

महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 29, 2025 | 02:55 PM
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी; CM फडणवीस, मंत्री बावनकुळेंकडून शोक व्यक्त
Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी आलेल्या या महाकुंभासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. मात्र मौनी अमावस्येच्या निमित्ताने ही गर्दी वाढली होती. मौनी अमावस्येमुळे अमृत स्नानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र महाकुंभमेळ्यामध्ये दुर्घटना झाली आहे. महाकुंभातील संगमवर असलेलं एक बॅरिअर तुटल्याने चेंगराचेंगरी झाली.  यामध्ये 15 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाला तर 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक भाविक सहभागी असल्याचे समोर येत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.

महाकुंभमधील दुर्घटनेवर महराष्ट्रातील नेत्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत प्रयागराजमध्ये घडलेली घटना वेदनादायी आहे, या घटनेत ज्या भाविकांचा मृत्यू  झाला आहे, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

काय आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ट्वीट? 

प्रयागराज महाकुंभ में हादसे की खबर बेहद दुखद है। इस घटना में जिन श्रद्धालुओं की मृत्यु हुई, मैं उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। जिन्होंने अपने परिजनों को खोया है, उनके साथ हमारी संवेदनाएँ हैं।
जो घायल हुए उन्हें जल्द स्वास्थ प्राप्त हो, ऐसी ईश्वर से प्रार्थना करता…

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2025

“ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. त्यांच्याप्रती आमच्या संवेदना आहेत. जखमी झालेले भाविक लवकरात लवकर बारे व्हावेत अशी देवाकडे प्रार्थना आहे.”

दरम्यान महाकुंभमध्ये घडलेल्या दुर्घटनेत अनेक भाविकांनी आपलिया जीव गमावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

#WATCH | Maha Kumbh Stampede | Mumbai: Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule says, "The incident was extremely unfortunate and the whole nation is worried. PM Narendra Modi has taken cognisance of the situation. Such an incident should not have happened but there are… pic.twitter.com/BbjlmEtpDX

— ANI (@ANI) January 29, 2025

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेची दखल घेतली आहे. ”

मोदी आणि योगी यांच्यात चर्चा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे. तासभरामध्ये दोन वेळा पंतप्रधान मोदी यांनी फोनवर योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली. तसेच त्यांच्याकडून क्षणाक्षणाचे अपडेट जाणून घेतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री योगी यांच्याशी चर्चा केली आहे. या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी तातडीने मदत देण्यावर भर दिला. भाजप अध्यक्ष आणि आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलून सर्व प्रकारची वैद्यकीय मदत देऊ केली. या संपूर्ण घटनेवर प्रशासनाकडून मिनिटा-मिनटाला लक्ष दिलं जात असून सर्व मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

नेमकं काय झालं?

महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. भाविक इकडेतिकडे पळू लागले. यादरम्यान अनेकजण खाली पडून जखमी झाले. संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या घटनेनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मेळा पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व आखाड्यांशी चर्चा सुरू आहे. अमृतस्नानाची वेळ काही काळानंतर निश्चित होऊ शकते. सर्व बॅरल ब्रिज आणि बॅरिकेड्स उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगम नाक्यावर गर्दी जमू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title: Cm devendra fadnavis and chandrashekhar bawankule post on social media expressed grief for mahakumbh stampede up marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • chandrashekar bawankule
  • devendra fadanvis
  • Mahakumbh 2025

संबंधित बातम्या

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
1

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Kadu VS Bawankule : बच्चू कडू आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी करतात…; चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा डिवचले
2

Kadu VS Bawankule : बच्चू कडू आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी करतात…; चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा डिवचले

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut
3

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut

“त्यांचं दुकानं बंद झाल्यामुळे त्यांना पंतप्रधान मोदींबद्दल ईर्ष्या…; निवृत्तीच्या चर्चेवरुन चंद्रशेखर बावनकुळे भडकले
4

“त्यांचं दुकानं बंद झाल्यामुळे त्यांना पंतप्रधान मोदींबद्दल ईर्ष्या…; निवृत्तीच्या चर्चेवरुन चंद्रशेखर बावनकुळे भडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.