Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमीत एसएसजीचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० लाखांचे योगदान

सुमीत एसएसजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेडने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० लाख रुपयांचे योगदान दिले. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 19, 2026 | 05:42 PM
Sumeet SSG contributes ₹50 lakh to the Chief Minister’s Relief Fund for drought-affected farmers

Sumeet SSG contributes ₹50 lakh to the Chief Minister’s Relief Fund for drought-affected farmers

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील दृष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमीत एसएसजीचा मदतीचा हात
  • मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० लाखांचे योगदान
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द

मुंबई :
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ‘सुमीत एसएसजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेड’च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० लाख रुपयांचे योगदान देण्यात आले. सुमीत एसएसजीचे अध्यक्ष सुमित साळुंके आणि उपाध्यक्ष दिएगो प्रिएटो ज्युनियर यांनी या मदतीचा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुमीत एसएसजीच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.

यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेती आणि पिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि उत्पादनातील घट यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन पाण्याच्या गरजा तसेच पशुधनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता यावरही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना वेळेवर मदत मिळणे गरजेचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

शेतकरी बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन सुमीत एसएसजीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी केवळ आपल्या नियमित कार्यक्षेत्रापुरती मर्यादित न राहता समाजाच्या व्यापक हितासाठी योगदान देण्यावर भर देत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Yogi Adityanath Golden Earrings : योगी आदित्यनाथ कानात सोन्याची कुंडलं का घालतात? जाणून घ्या धार्मिक परंपरा अन् किंमत

सुमीत एसएसजी हा भारतातील सुमीत ग्रुप एंटरप्रायझेस आणि स्पेनमधील एसएसजी ट्रान्सपोर्टे सॅनिटारियो यांच्यातील इंडो-स्पॅनिश संयुक्त उपक्रम आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) १०८ प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी सवलतधारक कंपनी म्हणून सुमीत एसएसजी, बीव्हीजी इंडिया यांच्या समवेत १० वर्षांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP-DBFOT) मॉडेलअंतर्गत कार्यरत आहे.

GTA 6 Game : पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् राघव चढ्ढा यांना ‘GTA 6’ गेमची क्रेझ; सोशल मीडिया पोस्टनं वेधलं लक्ष

या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात १,७५६ वाहनांचा आपत्कालीन प्रतिसाद ताफा तैनात करून त्याचे संचालन करण्याची जबाबदारी कंपनीकडे आहे. जागतिक दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान, डिजिटल प्रणाली आणि प्रगत प्रशिक्षण पद्धतींचा वापर करून राज्यभर सक्षम आणि दर्जेदार आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमातून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Web Title: Sumit ssg 50 lakh donation drought affected farmers maharashtra cheque to cm devendra fadnavis nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Maharashtra Drought 2026
  • maharashtra farmers

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी DCM सुनेत्रा पवार आल्या धावून; राष्ट्रवादीच्या पक्षातील आमदारांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
1

शेतकऱ्यांसाठी DCM सुनेत्रा पवार आल्या धावून; राष्ट्रवादीच्या पक्षातील आमदारांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

अकोल्यात दहा महिन्यांत 71 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; खरीप हंगामातील 62 जणांनी संपवली जीवनयात्रा
2

अकोल्यात दहा महिन्यांत 71 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; खरीप हंगामातील 62 जणांनी संपवली जीवनयात्रा

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित;  ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत
3

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित; ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत

Buldhana: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार करणार मदत; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे आश्वासन
4

Buldhana: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही! दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार करणार मदत; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.