
पाऊस आणि थंडीचा अंदाज (फोटो सौजन्य - iStock)
केवळ दिल्लीच नाही तर महाराष्ट्राताही पुण्यासह काही भागांमध्ये थंडीचा पारा ११ अंश सेल्सियस आला आहे. महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला आहे आणि यामध्ये आता काही ठिकाणी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. नक्की देशातील कोणत्या राज्यात पाऊस पडणार आपण जाणून घेऊया
Maharashtra Rain Alert: आता जा रे बाबा! राज्यात काही तास भयानक पाऊस असणार; IMD चा अलर्ट काय?
या राज्यांमध्ये थंडीचा इशारा
हवामान विभागाने मध्य प्रदेश, गुजरात, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि पूर्व राजस्थानसाठी थंडीचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्येही तीव्र थंडीचा अनुभव येत आहे. अहवालानुसार, राजस्थानमधील सिकर येथे आतापर्यंत सर्वात कमी तापमान ५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मध्य आणि पश्चिम भारतात थंड वारे वाहत आहेत आणि थंडीचा परिणाम या राज्यांमध्ये सर्वाधिक जाणवत आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये अनेक भागात किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये तापमान ७-१० अंश सेल्सिअस दरम्यान राहील असे सांगण्यात आले आहे
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
दरम्यान, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, माहे आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ४०-५० किमी/ताशी वेगाने वारे वाहू शकतात. तसंच हे वादळ भयानक पाऊस घेऊन येण्याची शक्यता आहे असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मान्सून संपला तरीही पाऊस सुरु; भात पिकाला वादळी पावसाचा मोठा धोका
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण
हवामान विभागाने सांगितले की, बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे २१ नोव्हेंबरपासून अंदमान समुद्रावर वादळासारखे हवामान आणि ३५-४५ किमी प्रतितास वेगाने आणि ५५ किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे निकोबार बेटांवर एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (७-२० सेमी) आणि अंदमान बेटांवर मुसळधार पाऊस (७-११ सेमी) पडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे, मच्छिमारांना २३ नोव्हेंबरपर्यंत अंदमान समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. उंच लाटा येण्याची शक्यता आहे. बोटी अत्यंत सावधगिरीने चालवल्या पाहिजेत.