काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक; ३० हून अधिक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात
काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कन्हैया कुमारसह, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभान आणि बिहार प्रदेश अध्यक्ष गरीब दास यांच्यासह ३० हून अधिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
‘स्थलांतर थांबवा, नोकऱ्या द्या’ या मागणीसाठी कन्हैया कुमार यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी पाटण्यात मोर्चा काढला होता. दरम्यान, पोलिसांनी मोर्चा राजपूर पुलाजवळ रोखला आणि कन्हैया कुमार यांना ताब्यात घेतलं. या मोर्चात संपूर्ण बिहारमधून कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रवासात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही भाग घेतला.
#WATCH | Patna, Bihar: During Congress’ ‘Palayan Roko, Naukri Do’ padyatra, party leader Sachin Pilot says, “The government should stop the migration that has been happening from Bihar in lakhs. We are asking for accountability. The youth have marched on the streets with us…… pic.twitter.com/DYbOelvFsx
— ANI (@ANI) April 11, 2025
ताब्यात घेतल्यानंतर कन्हैया कुमार म्हणाले की, आम्ही लाठीचार्ज किंवा पाण्याचा मारा करण्याची मागणी करत नाही आहोत. आमच्या घरातील नळाला पाणी आलं पाहिजे. बिहारची ‘नळपाणी योजना’ योग्यरित्या चालली पाहिजे आणि लोकांना त्यांच्या घरात पाणी मिळायला हवे. जेव्हा सरकार नळांमध्ये पाणी पुरवू शकत नाही, तेव्हा ते विद्यार्थी आणि तरुणांवर पाण्याच्या तोफांचा वापर करत, असल्याचा आरोप त्यांनी केला.
पक्षाचे नेते सचिन पायलट म्हणाले, “सरकारने बिहारमधून लाखोंच्या संख्येने होणारे स्थलांतर थांबवावे. तरुण आमच्यासोबत रस्त्यावर उतरले आहेत. सरकार फक्त आमची दिशाभूल करण्यासाठी आकडे जाहीर करत आहे. वास्तव मात्र खूप वेगळं असल्याचं ते म्हणाले.