Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्‌यावर आला आहे. पिनारायी विजयन हे केरळचे मुख्यमंत्री राहतील, अशा आशयाचे विधान मणिशंकर अय्यर यांनी केले होते.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 17, 2026 | 04:23 PM
Senior Congress leader Mani Shankar Aiyar strongly criticized the Congress political news

Senior Congress leader Mani Shankar Aiyar strongly criticized the Congress political news

Follow Us
Follow Us:

Political News : दिल्ली : मी गांधीवादी, नेहरूवादी आणि राजीववादी होते, पण राहुलवादी नाही, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधींवर आगपाखड केली. केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्‌यावर आला आहे. पिनारायी विजयन हे केरळचे मुख्यमंत्री राहतील, अशा आशयाचे विधान मणिशंकर अय्यर यांनी केले होते. त्या विधानाशी फारकत घेत काँग्रेस (Congress) पक्षाने अय्यर यांचा मागील काही वर्षांपासून पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावरून अय्यर संतप्त झाले आहेत. (Political News)

ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी रविवारी सीपीआय (एम) नेते पिनारायी विजयन केरळचे मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास व्यक्त केला होता. व्हिजन २०३१: विकास आणि लोकशाही या आंतरराष्ट्रीय परिसंवादात बोलताना त्यांनी सांगितले की, पंचायती राज व्यवस्थेत केरळचे सर्वोच्च स्थान कायदेशीररित्या सुरक्षित करण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यासाठी सूचनाही दिल्या, ते म्हणाले की, या ध्येयाकडे सर्वात प्रशंसनीय प्रगती करणारे राज्य म्हणजे केरळ आहे, जिथे मार्क्सवादी-लेनिनवादी पक्षाचे राज्य आहे. अय्यर यांच्या भूमिकेशी काँग्रेसने असहमती दर्शवली आहे.

हे देखील वाचा : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

बाकाही खेरा फक्त एक कठपुतळी

काँग्रेसच्या मीडिया आणि प्रचार विभागाचे प्रमुख पवन खैरा यांनी म्हटले आहे की, मणिशंकर अय्यर गेल्या काही वर्षांपासून पक्षाशी कोणताही संबंध नाही. ते केवळ त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार बोलतात आणि लिहितात, त्यावर मणिशंकर अय्यर यांनी खेरा यांच्यावरही टीका केली. आज के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे इतकी महत्त्वाची जबाबदारी आहे, पवन खेरासारख्या माणसाला पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पक्ष इतका गंभीर मुर्खपणा कसा करू शकतो? खेरा फक्त एक कठपुतळी आहेत, असे अय्यर म्हणाले आहेत.

आसाममध्ये काँग्रेसला झटका
आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेन बोरा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस पक्षाने अलिकडेच त्याना आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी वाटाघाटींचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली होती. भूपेन बोरा यानी सोमवारी सकाळी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते म्हणाले, हा स्वाभिमानाचा विषय आहे आणि मी पक्षाच्या कारभाराबद्दल केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्या चिंता व्यक्त केल्या आहेत.

हे देखील वाचा : ’पैनगंगा ‘मध्ये पुनर्वन्यीकरण प्रयोग यशस्वी; नर वाघ ‘जॉनी’ला मिळाली जोडीदार

खारगे समितीचा अहवाल सादर

पुण्यातील मुंढवा येथील कथित जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या खरगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आला आहे. अधिकृतरीत्या अहवालातील तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. महसूल मंत्री या अहवालाचा अभ्यास करून आवश्यक ती प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित अधिकारी किंवा व्यक्तींवर शिस्तभंगाची कारवाई, प्रकरणाची पुढील चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याचे सांगितले जाते. समितीने हा अहवाल सार्वजनिक करावा अशी शिफारसही केली असल्याचे समजते. या जमिन व्यवहारप्रकरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत चौकशी करण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीने गेल्या काही महिन्यांपासून जमीन व्यवहाराशी संबंधि कागदपत्रांची छाननी, महसूल विभागातील नोंदींच तपासणी तसेच संबंधित अधिकारी व पक्षकारांचे जबान नोंदवण्याचे काम केले. या अहवालात जमीन हस्तांतरण प्रक्रिया, झोन बदल, नोंदणीतील त्रुटी तसेच महसूल अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

Web Title: Senior congress leader mani shankar aiyar strongly criticized the congress political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Congress
  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
1

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा
2

सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

Panjab Congress Split: पंजाबमध्ये राजकीय भुकंप?  काँग्रेस खासदाराच्या अमित शाहांच्या भेटीने खळबळ
3

Panjab Congress Split: पंजाबमध्ये राजकीय भुकंप? काँग्रेस खासदाराच्या अमित शाहांच्या भेटीने खळबळ

बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला पुन्हा धमकी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांकडून तपास सुरू
4

बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला पुन्हा धमकी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांकडून तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.