congress leader mp rahul gandhi aggressive reaction on union budget 2025 by bjp
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे अर्थसंकल्प जाहीर केले आहे. सलग आठव्यांदा अर्थसंकल्प जाहीर करण्याचा विक्रम देखील सीतारमण यांनी आपल्या नावे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर हे पहिलेच बजेट होते. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले होते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या अर्थसंकल्पातून नवीन कर प्रणाली आखण्यात आली असून यामधून 12 लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आयकरमधून वगळण्यात आले आहे. मात्र यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, जागतिक अनिश्चिततेच्या काळात, आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल आवश्यक होता, पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झाल्याचा घणाघात केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात आली आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांनी आता अर्थसंकल्पावरुन टीकेची झोड उठवली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दुसरीकडे, बसपा सुप्रीमो मायावती यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन राष्ट्रीय हिताचे कमी आणि राजकीय हिताचे जास्त असे केले आहे. मायावती यांनी लिहिले आहे की, “देशातील महागाई, गरिबी, बेरोजगारी यांच्या प्रचंड परिणामामुळे तसेच रस्ते, पाणी, शिक्षण, शांतता आणि आराम यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे, सुमारे १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील लोकांचे जीवन खूपच कठीण झाले आहे. अडचणीत, ज्याचा केंद्रीय अर्थसंकल्प १००% आहे. याद्वारेही उपाय आवश्यक आहे. परंतु, काँग्रेसप्रमाणेच, सध्याच्या भाजप सरकारचा अर्थसंकल्पही लोकांच्या आणि राष्ट्रीय हितावर कमी, राजकीय हितावर जास्त केंद्रित असल्याचे दिसून येते. जर असं नसेल तर या सरकारच्या काळातही लोकांचे जीवन सतत त्रासदायक, दयनीय आणि दुःखी का आहे? ‘विकसित भारताचे’ स्वप्न बहुजनांच्या हिताचे असले पाहिजे,” असा टोला मायावती यांनी लगावला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल अपडेट घ्या जाणून एका क्लिकवर
त्याचबरोबर सपा प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारने अर्थसंकल्पाच्या आकडेवारीसह कुंभमेळ्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचे आकडे द्यावेत, अशी मागणी केली. मात्र, पंतप्रधान मोदींनी याला सर्वसामान्यांसाठी खिसा भरणारा अर्थसंकल्प म्हटले आहे. या अर्थसंकल्पामुळे केवळ खासगी क्षेत्राला चालना मिळणार नाही तर देशात मोठे बदल पाहायला मिळतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्देवी बजेटवर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “गेल्या 10 वर्षांपासून मध्यमवर्गीय या बहिऱ्या आणि मुक्या सरकारकडून दिलासा मागत आहेत आणि आज त्यांची मागणी ऐकली गेली आहे. लोकसभेतील 240 (भाजपच्या जागा) च्या सत्तेमुळेच अहंकारी सरकारला त्यांचा आवाज ऐकण्यास भाग पाडले आहे. या घोषणेमुळे जनतेला दिलासा मिळेल. उत्पन्न वाढत नव्हते, बचत होत नव्हती, खर्च सतत वाढत होता. आता आयकरात सूट मिळाल्याने मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे, मी त्याचे स्वागत करते,” असे मत खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले आहे.