
Congress Politics, Digvijay Singh, Rahul Gandhi,
दिग्विजय यांनी संघटना मजबूत करण्यासाठी विकेंद्रीकरणाची आवश्यकता असलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधींना (Rahul Gandhi) थेट टॅग केले होते. आपले विचार गांभीर्याने घेतले जात नाहीत, म्हणून सीडब्ल्यूसी बैठकीपूर्वी त्यांनी आरएसएस आणि भाजपच्या संघटनात्मक कौशल्याचे कौतुक करणारी दुसरी पोस्ट पोस्ट केली,असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान,
दिग्विजय सिंह यांनी यापूर्वी पक्ष संघटना मजबूत करण्याचे समर्थन केले आहे. मत चोरीविरुद्ध मोहीम जाहीर केल्यानंतरही, त्यांनी देशभरातील वॉर्ड पातळीवर काँग्रेस संघटना अस्तित्वात आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता.
त्यानंतर, दिग्विजय सिंह यांनी बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्विजय सिंह म्हणाले की, संघटन निर्मिती मोहिमेअंतर्गत जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जात असली तरी, त्यांच्या प्रश्नावरून असे दिसून येते की ते संपूर्ण प्रक्रियेवर समाधानी नाहीत. आरएसएस ही एक धोकादायक संघटना आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी वॉर्ड पातळीपर्यंत एक मजबूत संघटना आवश्यक आहे. तळागाळातील संघटनेशिवाय पक्षाचे कार्यक्रम यशस्वी होणार नाहीत. दरम्यान, बहुतेक संघटनात्मक काम सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याकडून केले जात आहेत. काँग्रेस पक्षातील या राजकीय संघर्षाकडे दिग्विजय विरुद्ध केसी संघर्ष म्हणूनही पाहिले जात आहे.
दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस (Congress) पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणाबद्दल विधान केले. पक्षात अनेक स्लीपर सेल सक्रिय आहेत आणि त्यांना ओळखण्याची आवश्यकता आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पण त्याचवेळी त्यांच्या विधानामुळे पक्षात आणि बाहेर राजकीय गोंधळ उडाला, बराच काळ पोर्टफोलिओशिवाय सरचिटणीस असलेल्या प्रियंका गांधी यांना संघटनेत अधिक महत्त्वाची भूमिका द्यावी,अशीही मागणी सातत्याने होत आहे. तथापि, जेव्हा दिग्विजय सिंह यांनी बैठकीत आपले विचार व्यक्त केले तेव्हा सर्वांनी शांतपणे ऐकले आणि पक्षाने हा मुद्दा वाढवू नये असा निर्णय घेतला.
महत्त्वाची बाब म्हणजे माध्यम विभागापासून ते मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी या विषयावर मौन बाळगले होते. मनरेगा वाचवा मोहिमेच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या खर्गे यांनी ५ जानेवारीपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली. तर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करत मंत्र्यांनाही धोरणात्मक बदलांची माहिती नसल्याचा आरोप केला. मात्र, दिग्विजय सिंह यांच्याशी संबंधित प्रश्न टाळण्यासाठी दोन्ही नेत्यांनी प्रश्नोत्तर सत्र सुरू होण्यापूर्वीच व्यासपीठ सोडले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान करण्यात आलेल्या काही विधानांवरून खर्गे यांनी दिग्विजय सिंह आणि शशी थरूर या दोघांनाही फटकारले. भारतातील घडामोडींची तुलना बांगलादेशशी करणे अयोग्य असून, अशा विधानांमुळे पक्षाचे नुकसान होते, असे त्यांनी दिग्विजय सिंह यांना स्पष्टपणे सांगितले. तसेच, परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करू नयेत, या शशी थरूर यांच्या भूमिकेशी खर्गे यांनी असहमती दर्शवली. परराष्ट्र धोरणात त्रुटी असतील तर त्या नक्कीच उपस्थित केल्या पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.