नीट व जेईई प्रवेश परीक्षांत 'फेशियल रेकग्निशन' तंत्रज्ञान बंधनकारक
नव्या प्रणाली अंतर्गत, आता उमेदवारांना परीक्षा अर्ज सादर करताना थेट मोबाईल किंवा संगणकाच्या कॅमेरातून लाइव्ह फोटो अपलोड करणे अनिवार्य राहणार आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार हा बदल राबवला जात असून यामुळे अर्ज करणारा विद्यार्थी आणि प्रत्यक्ष परीक्षेला बसणारा उमेदवार या दोघांच्या ओळखीतील फरक त्वरित लक्षात येऊ शकेल.
नीट २०२५ परीक्षेदरम्यान दिल्लीतील काही निवडक केंद्रांवर ‘आधार-आधारित फेशियल रेकग्निशन’ची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली होती. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरल्याने आगामी २०२६ पासून देशातील सर्व केंद्रांवर ही तंत्रप्रणाली लागू करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे.
‘प्रशांत जगताप यांना दिलेला शब्द पाळणार’; काँग्रेस नेते वडेट्टीवारांचं मोठं विधान
या तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उमेदवाराच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांचे सखोल विश्लेषण करते आणि ते डेटाबेसमध्ये जतन करते. परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा थेट स्कॅनद्वारे चेहरा तपासला जाईल आणि डेटाबेसशी जुळणारी ओळख पटल्याशिवाय कोणालाही परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही.
– डमी उमेदवारांना प्रवेश मिळणे अशक्य
– फसवणूक आणि पेपरफुटी प्रकारावर मोठा अंकुश
– उमेदवारांच्या सुरक्षिततेसह परीक्षा प्रक्रियेत वाढती पारदर्शकता
– देशभर एकसमान परीक्षा सुरक्षायंत्रणा लागू






