Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीपूर्वी जम्मू-कश्मीरात काहीतरी मोठं घडणारं? पूंछमध्ये अडकला दहशतवाद्यांचा कमांडर,पाहा व्हिडीओ

लष्कराच्या जवानांनी शनिवारी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, या घटनेत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करत असताना झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 15, 2024 | 11:38 AM
निवडणुकीपूर्वी जम्मू-कश्मीरात काहीतरी मोठं घडणारं? पूंछमध्ये अडकला दहशतवाद्यांचा कमांडर,पाहा व्हिडीओ
Follow Us
Close
Follow Us:

पुंछ: जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील एका गावात रविवारी (15 सप्टेंबर) सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.  या कारवाईत एका मोठ्या दहशतवादी संघटनेचा कमांडर तेथे अडकल्याचे  माहिती समोर आली आहे.

तेथील एका दुर्गम गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलीस आणि लष्कराने शनिवारी संध्याकाळी मेंढर उपविभागातील गुरसाई टोपजवळील पठाणीर भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली होती. एक संयुक्त पथक दहशतवाद्यांचा शोध घेत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर दोघांमध्ये चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू आहे. या भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा: ‘संविधान बदला’च्या नॅरेटिव्हची धास्ती; दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपचा नवा प्ल्रॅन

किश्तवाडमध्येही सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, किश्तवाडमधील दाछन भागातही सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. 13 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या दोन जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले.

काल बारामुल्लामध्ये चकमक झाली, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी 3 दहशतवादी ठार

आज झालेल्या चकमकीपूर्वी 14 सप्टेंबरला , केंद्रशासित प्रदेश (UT) असलेल्या बारामुल्ला येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर ब्रिगेडियर संजय कन्नोथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कारवायांच्या माहितीवरून सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीर जिल्ह्यातील पट्टण भागातील चक टप्पर क्रिरीमध्ये शोध मोहीम सुरू केली होती. रिकाम्या इमारतीत दहशतवाद्यांनी आमच्या जवानांवर गोळीबार केला. नंतर घेराव घालून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करणे हे “मोठे यश” असल्याचे  सांगितले.

हेही वाचा: आनंदाश्रमात नोटांचा वर्षाव; एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

राजौरीमध्ये एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी, एक जवान जखमी

दरम्यान, लष्कराच्या जवानांनी शनिवारी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, या घटनेत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करत असताना झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात ही चकमक झाली जेव्हा नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या एका गटाला रोखले.

#WATCH | J&K | Encounter is underway between security forces and terrorists in the Pathanateer area of the Mendhar sector of Poonch after rounds of fire were heard last night. Gunshots can be heard in the background.

(Visuals deferred by unspecified time) https://t.co/M2OUKNqQD2 pic.twitter.com/ReZZs1DttD

— ANI (@ANI) September 15, 2024

जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका

केंद्रशासित प्रदेशात आगामी काळात होणारे महत्त्वाचे कार्यक्रम पाहता, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे कट उधळून लावण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आणि सुरक्षा दलांसाठी उल्लेखनीय यश आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. जम्मू विभागातील डोडा, किश्तवाड, रामबन, रियासी, पुंछ, उधमपूर, कठुआ, जम्मू आणि सांबा जिल्ह्यात  25 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील आणि 1 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

हेही वाचा:  लेडी-डॉक्टर ऐटीत बसलेली अन् बाप्पाच्या हातात फासावर लटकवलेला आरोपी, 

Web Title: Conspiracy to carry out major terrorist activities in jammu and kashmir before elections nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • jammu kashmir
  • Terrorist Activities

संबंधित बातम्या

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह
1

इराकमधील नरसंहाराचे काळेकुट्ट पान! अल-खफसा येथे सर्वात मोठ्या एकाच कबरीत दफन 4 हजारांहून अधिक मृतदेह

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता
2

Cloudburst in Kishtwar: किश्तवाडमध्ये आभाळ फाटलं; आतापर्यंत ४जणांचा मृत्यूची नोंद, आकडा वाढण्याची शक्यता

Cloud Burst in Kishtwar: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर; किश्तवाडमध्ये ढगफुटी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता
3

Cloud Burst in Kishtwar: जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर; किश्तवाडमध्ये ढगफुटी, मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याची शक्यता

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी
4

Jammu And Kashmir: उधमपूरमध्ये मोठा अपघात… CRPF जवानांची बस 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जवानांचा मृत्यू; 16 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.