1. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे सर्च ऑपरेशन
2. अनेक दहशतवाद्यांना घेरले
3. उधमपुर आणि किश्तवाडमध्ये 2 जवान जखमी
Terrorist Killed In Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. भारताच्या लष्कराने जम्मू काश्मीरच्या उधमपुर अन् किश्तवाडमध्ये 7 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना घेरले आहे. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याचे समोर येत आहे. उधमपुरमध्ये असलेले दहशतवादी जैश ए मोहम्मद या संघटनेचे असण्याची शक्यता आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. त्यातच आता उधमपुर आणि किश्तवाडमध्ये सैन्याने अनेक दहशतवाद्यांना घेरले आहे. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात या भागात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.
उधमपुर भागात दहशतवादी असल्याचे समजताच लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या कारवाईत जम्मू काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे जवान सहभागी झाले आहेत. सर्च ऑपरेशन राबवले जात असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. दरम्यान सुरक्षा दलांनी देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे समजते आहे.
दरम्यान शुक्रवारी म्हणजे काल सरूक्ष दलांनी किश्तवाडमध्ये देखील दहशतवादी लपले असल्याचे समजताच सर्च ऑपरेशन सुरू केले होते. अनेक तासांच्या सर्च ऑपरेशननंतर सुरक्षा दल यांनी दहशतवाद्यांना घेरले आणि गोळीबार सुरू केला. सध्या त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरूच आहे.
कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांचे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन गुड्डर सुरू केले आहे. दरम्यान या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाल्याचे देखील समजते आहे. तसेच 3 जवान जखमी झाल्याचे समोर येत आहे. कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
भारतीय लष्कराने गुड्डर जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. संपूर्ण जंगलाला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. मोठ्या प्रमाणात सैनिक या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवत आहेत. दरम्यान कंठस्नान घातलेला एक दहशतवादी सुरक्षा दलांच्या हीटलिस्टमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमध्ये मोठे ऑपरेशन हाती घेतले आहे. दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.
कंठस्नान घातलेले दहशतवादी लष्कर ए तोयबाचे असल्याची शंका उपस्थित होत आहे. त्या दृष्टीने तपास केला जात आहे. या कारवाईत भारतीय लष्कर, पोलिस दल, सीआरपीएफची तुकडी सामील झाले आहेत. या जंगलात अजून काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूने तूफान गोळीबार सुरू आहे.