Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naxalite Killed: ‘या’ सीमेवर थरार! सुरक्षा दलांनी तोडली नक्षलवाद्यांची कंबर; टॉप कमांडर देवजी अन्…

केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपूर्णपणे नष्ट करण्याचे ध्येय ठेवले आहे. शरण या किंवा मारले जा असे दोनच पर्याय सरकारने नक्षलवाद्यांच्यासमोर ठेवले आहेत. सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2025 | 05:30 PM
Naxalite Killed: 'या' सीमेवर थरार! सुरक्षा दलांनी तोडली नक्षलवाद्यांची कंबर; टॉप कमांडर देवजी अन्...

Naxalite Killed: 'या' सीमेवर थरार! सुरक्षा दलांनी तोडली नक्षलवाद्यांची कंबर; टॉप कमांडर देवजी अन्...

Follow Us
Close
Follow Us:

मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपूर्णपणे नष्ट करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय 
आंध्र प्रदेश ओडीशा सीमेवर सुरक्षा दलांची मोठी कामगिरी 
50 पेक्षा जास्त नक्षलवादी ताब्यात

केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपूर्णपणे नष्ट करण्याचे ध्येय ठेवले आहे. शरण या किंवा मारले जा असे दोनच पर्याय सरकारने नक्षलवाद्यांच्यासमोर ठेवले आहेत. सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली आहे. दरम्यान आंध्र प्रदेश आणि ओडीशा राज्याच्या सीमेवर पुन्हा काही नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. 50 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आंध्र प्रदेश आणि ओडीशा राज्यांच्या सीमावर्ती भागांत सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात सर्वात मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दलांनी रचलेल्या सापळ्यात 50 नक्षलवादी अडकले. तर 7 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले.

या कारवाईत टॉप कमांडर देवजी आणि टेक्निकल एक्स्पर्ट शंकर यांना ठार मारण्यात आले. सीमावर्ती भागातील घनदाट जंगलात ही ऑपरेशन राबवले गेले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. या ठिकाणी नक्षलवादी आपले आश्रयस्थान तयार करत असल्याची माहिती मिळताच या परिसराला वेढा घालण्यात आला, त्यानंतर ही कारवाई केली गेली.

टॉप नक्षल कमांडर हिडमा ठार

छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील अल्लुरी सीताराम जिल्ह्यातील जंगलात एक मोठी चकमक झाल्याची माहिती मिळाली. ग्रेहाउंड्स जवानांनी केलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांची नक्षलवादी कार्यकर्त्यांशी चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, काही वरिष्ठ कार्यकर्त्यांसह सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दल या भागात शोधमोहीम सुरू ठेवत आहेत. दरम्यान, कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा (४३) याला सुरक्षा दलांनी ठार मारले आहे. २०१३ च्या दरभा व्हॅली हत्याकांड आणि २०१७ च्या सुकमा हल्ल्यासह हिडमा किमान २६ सशस्त्र हल्ल्यांसाठी जबाबदार होता.

Naxalite Hidma Killed : टॉप नक्षल कमांडर हिडमा ठार, ४५ लाखांचे बक्षीस, सुकमा चकमकीत सहा नक्षलवादी ठार

एराबोर पोलीस स्टेशन परिसरातील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या चकमकीत सहा माओवादी ठार झाल्याची पुष्टी झाली आहे, ज्यात एका वरिष्ठ माओवादी नेत्याचा समावेश आहे. सुरक्षा दल घटनास्थळी शोध मोहीम राबवत आहेत आणि आजूबाजूच्या घनदाट जंगलात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश-छत्तीसगड–ओडिशा सीमावर्ती भागात माओवादी कारवायांमध्ये अलिकडेच वाढ झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली. राज्याचे डीजीपी हरीश कुमार गुप्ता परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि ही मोहीम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Crpf and police arrested 50 naxalists and killed 7 in andhraodisha border marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Anti-Naxal operation
  • Naxalist

संबंधित बातम्या

Real Estate क्षेत्रात 16000 रोजगार संधी! ₹४,५०० कोटींची होणार गुंतवणूक
1

Real Estate क्षेत्रात 16000 रोजगार संधी! ₹४,५०० कोटींची होणार गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.