Breaking: छत्तीसगडमध्ये जोरदार धुमश्चक्री; एका नक्षलवाद्याला कंठस्नान, CRPF जवनांचा जंगलाला वेढा
रायपूर: छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. गरियाबंद जिल्ह्यातील कुलहाडी घाटातील जंगलात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांचात धुमश्चक्री सुरू आहे. सुरक्षा यंत्रणेने एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातले आहे. तर या चकमकीत एक कोब्रा कमांडो जखमी झाल्याचे समोर येत आहे. पुढील उपचारांसाठी जखमी झालेल्या कोब्रा कमांडोला एअरलिफ्ट केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कोब्रा कमांडो यांनी या संपूर्ण जंगलाला वेढा घातला आहे.
सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू असून पोलिसांची कुमक देखील या ठिकाणी पोहोचत आहे. कोब्रा कमांडो आणि पोलीस यंत्रणा संयुक्तपणे ही कारवाई करत आहेत. तसेच जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांना घेराव घातला जात आहे. एकही नक्षलवादी सुटून जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने नक्षलवादी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, छत्तीसगड आणि ओडीशा सीमेवर सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. ओडीशा आणि छत्तीसगड पोलिसांनी सीआरपीएफच्या मदतीने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. सैन्य दले आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू असल्याचे म्हटले जात आहे. सुरक्षा यंत्रणेने संपूर्ण जंगलाला घेरले आहे.
सुरक्षा यंत्रणांनी 3 नक्षलवाद्यांना ठोकलं; छत्तीसगडमध्ये चकमकीचा थरार
गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकार आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद मूळापासून उखडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सातत्याने सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झालेली पाहायला मिळते. दरम्यान छत्तीसगडमध्ये अशीच एक चकमक सुरक्षा यंत्रणामध्ये झाली आहे. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा यंत्रणेने 3 नक्षलवाद्यांना ठार केले आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सोरेनाम जंगलात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी आमनेसामने आले. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा यंत्रणेने चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत 3 नक्षलवादी मारले गेले. डीआरजी आणि एस्टीफ जवनांनी अजूनही सोरेनाम जंगलाला वेढा घातला असल्याचे समजते आहे. जवळजवळ 300 पेक्षा जास्त जवान हे या कारवाईत सहभागी असून त्यांनी संपूर्ण जंगल वेढले आहे. नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठं यश
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणा मोठ यश मिळालं आहे. नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा अभियान सुरु आहे. यामध्ये नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी सुरक्षा दलाला मोठे यश आले. सीमेवर चकमकीमध्ये सुरक्षा यंत्रणांनी शौर्य दाखवत 30 नक्षलवादींचा खात्मा केला आहे. घटनास्थळावर 600 जवान तैनात करण्यात आले असून या ठिकाणी जवानांना मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक शस्त्रे सापडली आहेत. छत्तीसगडमधील नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात अबूझमाड येथे नक्षलवाद्यांसोबतची चकमक येथे झाली. हा परिसर सीमाभागात येत असून या क्षेत्रात नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर सुरक्षादलाच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले.