छत्तीसगड: छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होताना पहायला मिळत आहे. दोन ते दिन दिवसांपूर्वी विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती. आज पुन्हा एकदा बुरगुमच्या घनदाट जंगलात सीआरपीएफ आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली आहे. जोरदार धुमश्चक्रीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. त्यांच्याकडील शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, बस्तरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सैनिकांनी दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मृत्यू झालेल्यापैकी एक कमांडर असल्याचे सांगितले जात आहे. बुरगुमच्या जंगलात अजूनही ही कारवाई सुरू आहे. जवानांनी जंगलात नक्षलवाद्यांच्या मृतदेहाजवळून शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त केला आहे.
छत्तीसगडमध्ये २ नक्षलवाद्यांना ठोकण्यात यश
इंद्रावती नदीच्या आसपास असणाऱ्या जंगल परिसरात नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाना प्राप्त झाली. त्यानुसार सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. आज सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास सुरक्षा दले अन् नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यानंतर या सर्च ऑपरेशनमध्ये २ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.
सीआरपीएफच्या माहितीनुसार, हे सर्च ऑपरेशन शनिवारी सकाळी सुरू झाले होते. चकमकीदरम्यान कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही. तर २ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमक अजूनही सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
Big Breaking: सुरक्षा दलांनी जंगलाला वेढा घातला अन्…; छत्तीसगडमध्ये २ नक्षलवाद्यांना ठोकण्यात यश
सुरक्षा दल-नक्षलवाद्यांच्यात चकमक
छत्तीसगड सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी छत्तीसगड सीमेवर नक्षलग्रस्त भागात आपली शोध मोहीम आणि कारवाईचा वेग वाढवला आहे. या दरम्यान सुरक्षा दलाला मोठे यश प्राप्त झाले आहे. छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलांनी 25 लाख रुपये बक्षीस असलेल्या महिला नक्षलवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे.
मंगळवारी दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी माओवादी सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली होता, ज्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. यासोबतच घटनास्थळावरून इन्सास रायफल, ३०३ रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला.
सुकमामध्ये १६ नक्षलवादी ठार
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज सकाळपासून नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलांशी सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही चकमक सुकमा जिल्ह्यातील केरळपाल पोलिस स्टेशन परिसरात होत आहे. या वर्षी आतापर्यंत ११६ हून अधिक माओवादी मारले गेले आहेत. छत्तीसगडमधील सुकमा आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १६ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.