Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber frauds: देशात ३००० कोटींचा सायबर फ्रॉड! सुप्रीम कोर्टाचे जज हादरले; म्हणाले, ‘कठोर उपाययोजना आणि…’

संपूर्ण देशात सायबर फसवणुकीतून सुमारे ३,००० कोटी रुपयांची ठगी झाल्याचे कळताच, सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आश्चर्य व्यक्त केले आणि या प्रकरणांना गांभीर्याने संबोधित करण्याची भूमिका घेतली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 03, 2025 | 10:10 PM
देशात ३००० कोटींचा सायबर फ्रॉड! सुप्रीम कोर्टाचे जज हादरले (Photo Credit - X)

देशात ३००० कोटींचा सायबर फ्रॉड! सुप्रीम कोर्टाचे जज हादरले (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘डिजिटल अटक’ घोटाळ्यावर सर्वोच्च न्यायालय गंभीर
  • न्यायाधीश म्हणाले, “सख्त आणि कठोर आदेश दिले नाहीत तर….”
  • ‘संस्थेच्या प्रतिष्ठेवर थेट हल्ला’

नवी दिल्ली: देशातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या, विशेषतः ‘डिजिटल अटक’ (Digital Arrest) प्रकरणांवर सुप्रीम कोर्टाने सोमवारी सख्त कारवाईची गरज व्यक्त केली. संपूर्ण देशात सायबर फसवणुकीतून सुमारे ३,००० कोटी रुपयांची ठगी झाल्याचे कळताच, सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आश्चर्य व्यक्त केले आणि या प्रकरणांना गांभीर्याने संबोधित करण्याची भूमिका घेतली.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या आकडेवारीवर चिंता व्यक्त केली. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले,

“हे धक्कादायक आहे की पीडितांकडून सुमारे ३,००० कोटी रुपये वसूल केले गेले आहेत आणि हे सर्व आपल्या देशातच घडत आहे. जर आपण सख्त आणि कठोर आदेश दिले नाहीत, तर समस्या आणखी वाढेल. आम्ही यावर कठोरपणे लक्ष देऊ.”

गृह मंत्रालय आणि सीबीआयने यासंबंधीचा अहवाल सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, गृह मंत्रालयात एक स्वतंत्र युनिट या समस्येवर काम करत असून अनेक पाऊले उचलली जात आहेत. संक्षिप्त सुनावणीनंतर न्यायालयाने योग्य निर्देश जारी केले जातील असे सांगत, पुढील सुनावणी १० नोव्हेंबर पर्यंत तहकूब केली.

हे देखील वाचा: मोठी बातमी! न्यायमूर्ती सूर्यकांत असतील भारताचे ५३ वे सरन्यायाधीश; जाणून घ्या कधी स्वीकारणार पदभार

वयोवृद्ध दाम्पत्याच्या तक्रारीवरून स्वतःहून दखल

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याने केलेल्या तक्रारीची स्वतःहून (Suo Motu) दखल घेतली होती. या दाम्पत्याची आयुष्यभराची जमापुंजी ‘डिजिटल अटक’ घोटाळ्याच्या माध्यमातून हडप करण्यात आली होती. घडलेली घटना अंबाला येथील ७३ वर्षीय महिलेने आरोप केला होता की, घोटाळेबाजांनी सर्वोच्च न्यायालयाच्या जाली (बनावट) आदेशांचा वापर करून त्यांना डिजिटल अटकेत फसवले आणि त्यांच्याकडून १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळली. बनावट आदेश या धोकेबाजांनी कथितरित्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या जाली स्वाक्षरी असलेला आदेश सादर केला होता.

‘संस्थेच्या प्रतिष्ठेवर थेट हल्ला’

या प्रकरणाच्या मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक प्रणालीच्या प्रतिष्ठेवर होत असलेल्या हल्ल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाची टिप्पणी “न्यायाधीशांच्या जाली हस्ताक्षरांसह न्यायिक आदेशांचे निर्माण, कायद्याच्या राज्याव्यतिरिक्त, न्यायिक प्रणालीवरील जनतेच्या विश्वासाच्या पायावरही प्रहार करते. अशा प्रकारची कारवाई संस्थेच्या प्रतिष्ठेवर ‘सीधा हमला’ (थेट हल्ला) आहे.”

न्यायालयाने गेल्या आठवड्यात देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या घटनांची चौकशी करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस जारी केली होती आणि चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या सायबर अटक प्रकरणांचा तपशील सादर करण्यास सांगितले होते.

हे देखील वाचा: Supreme Court News: निर्दोषांना त्रास देण्यासाठी हा कायदा नाही; धर्मांतर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Web Title: Cyber fraud of rs 3000 crores in the country supreme court judge shocked said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 10:10 PM

Topics:  

  • Cyber Fraud
  • india
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Second Hand Car Buying Tips: सेकंड हँड कार खरेदी करताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा स्वस्त डील महाग पडू शकते!
1

Second Hand Car Buying Tips: सेकंड हँड कार खरेदी करताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा स्वस्त डील महाग पडू शकते!

Rare Earth Magnet: सरकारने केली व्यवस्था, रू. 70000000000 च्या संंजीवनीमुळे चीनचा दबदबा होणार कमी, काय आहे तयारी
2

Rare Earth Magnet: सरकारने केली व्यवस्था, रू. 70000000000 च्या संंजीवनीमुळे चीनचा दबदबा होणार कमी, काय आहे तयारी

India-US Trade Deal: अमेरिकेच्या टॅरिफचे विनाशकारी परिणाम; चार महिन्यांत निर्यातीत ३७% घट, ‘या’ क्षेत्रांत सर्वाधिक घसरण
3

India-US Trade Deal: अमेरिकेच्या टॅरिफचे विनाशकारी परिणाम; चार महिन्यांत निर्यातीत ३७% घट, ‘या’ क्षेत्रांत सर्वाधिक घसरण

Telangana Accident : तेलंगणामध्ये भीषण अपघात, ७० जणांना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकली, २० जणांचा मृत्यू
4

Telangana Accident : तेलंगणामध्ये भीषण अपघात, ७० जणांना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकली, २० जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.