Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दाना’ चक्रीवादळाचा धोका: ओडिशामध्ये शाळा-कॉलेज बंद; संपूर्ण राज्यात अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी खोल दाब क्षेत्रात रूपांतरित झाले असून, यामुळे बुधवारी त्याचे 'दाना' या चक्रीवादळात रूपांतर होईल ज्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 23, 2024 | 11:33 AM
'दाना' चक्रीवादळाचा धोका: ओडिशा-बंगालमध्ये शाळा-कॉलेज बंद; संपूर्ण राज्यात अलर्ट जारी

'दाना' चक्रीवादळाचा धोका: ओडिशा-बंगालमध्ये शाळा-कॉलेज बंद; संपूर्ण राज्यात अलर्ट जारी

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी खोल दाब क्षेत्रात रूपांतरित झाले असून, यामुळे बुधवारी त्याचे ‘दाना’ या चक्रीवादळात रूपांतर होणार आसल्याची माहिती समोर आली आहे. या चक्रीवादळाचा ओडिशाच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 24 ऑक्टोबरला सकाळी हे चक्रीवादळ उत्तर बंगालच्या उपसागरात पोहोचेल आणि 24 ऑक्टोबरच्या रात्री किंवा 25 ऑक्टोबरच्या सकाळी ओडिशातील पुरी आणि पश्चिम बंगालच्या सागर दीपपुंज परिसरात किनारा पार करेल.

ओडिशा मध्ये शाळा-कॉलेज बंद

यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे दाना चक्रीवादळाच्या धोक्यामुळे ओडिशा सरकारने शाळा आणि महाविद्यालये 26 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ओडिशाच्या किनारी भागात 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओडिशाला जाणार होत्या. मात्र, दाना चक्रीवादळामुळे यांचा प्रस्तावित तीन दिवसांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यात अलर्ट जारी

ओडिशाच्या महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन  दिलेल्या माहितीनुसार, 17 ओडीआरएएफ टीम्स किनारी जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पर्यटकांना पुरीला न जाण्याचा आणि 24-25 ऑक्टोबर रोजी शहर रिकामे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भुवनेश्वर हवामान विभागाच्या संचालक मनोरमा महापात्रा यांनी सांगितले की, बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय होईल, ज्यामुळे ओडिशातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हावडा-पुरी मार्गावरून जाणाऱ्या गाड्या रद्द

तसेच या दाना चक्रीवादळाचा परिणाम झारखंड आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागातही होईल असे सांगण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हावडा-पुरी मार्गावरून जाणाऱ्या 178 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानीसह इतर अनेक गाड्यांचा समावेश आहे. इंडियन कोस्ट गार्डने तटरक्षक दलाची जहाजे आणि विमाने तैनात केली असून, मच्छीमार आणि खलाशांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत.

हे देखील वाचा- इराकमध्ये इस्लामिक स्टेटविरोधात मोठी कारवाई; कमांडरसह 9 दहशतवादी ठार

Web Title: Cyclone dana threat schools colleges closed in odisha bengal alert issued across the state nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 11:33 AM

Topics:  

  • Cyclone

संबंधित बातम्या

Tropical Cyclone: बलाढ्य चीनला चक्रीवादळाचा मोठा फटका! 170 प्रतितास वेगाने वारा थेट…
1

Tropical Cyclone: बलाढ्य चीनला चक्रीवादळाचा मोठा फटका! 170 प्रतितास वेगाने वारा थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.