फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बगदाद: इराकमध्ये सध्या इस्लामिक स्टेटविरोधात (ISIS) या दहशतवादी संघटनेविरुद्ध मोठी लष्करी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लष्करी कारवाईदरम्यान इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी संघटनेचा एक कमांडर आणि इतर आठ दहशतवादी मारले गेले आहेत. या घटनेची माहिती देताना इराकच्या पंतप्रधानांनी दिली. अमेरिकन सुरक्षा दलांनी संयुक्तपणे सहभाग घेतला होता. दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्यांनी आणखी एक मोठी माहिती दिली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकन आणि इराकी सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री संपूर्ण संयुक्त कारवाई केली आणि यादरम्यान दोन अमेरिकन सैनिकही जखमी झाले आहेत.
इराकमध्ये दहशतवादाला कुठेही जागा नाही- इराकचे पंतप्रधान
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई इराकच्या सलाहुद्दीन प्रांतातील हमरीन पर्वतीय भागात करण्यात आली आहे. इराकी पंतप्रधानांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, हल्ल्यात जस्सिम अल-माझरुई अब्दुल कादिर नावाचा एक प्रमुख इस्लामिक स्टेट कमांडर ठार झाला आहे. अल-सुदानी यांनी ठामपणे सांगितले की, ‘इराकमध्ये दहशतवादाला कुठेही जागा नाही. आम्ही त्यांचा पाठलाग करत राहू आणि त्यांच्या प्रत्येक लपलेल्या ठिकाणावर हल्ला करू.’
हे देखील वाचा- इस्रायलचे बेरूतमध्ये बॉम्ब हल्ले; 12 हून अधिक लोकांचा मृत्यू अनेकजण जखमी
अमेरिकेचे दोन सैनिक जखमी
दरम्यान, अमेरिकन हवाई दलाचे मेजर जनरल पॅट रायडर यांनीही ऑपरेशन दरम्यान दोन अमेरिकन सैनिक जखमी झाल्याची पुष्टी केली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. हे संयुक्त ऑपरेशन दहशतवादी संघटनेच्या उच्चस्तरीय नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आले होते, परंतु अमेरिकन अधिकाऱ्यांनी अब्दुल कादिरच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी अद्याप केलेली नाही. हे हल्ले आंतरराष्ट्रीय युती दलांच्या अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आले.
इराकी आणि अमेरिकन सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्ननामुळे कारवाईत यश
संयुक्त ऑपरेशन कमांडरने दिलेल्या निवेदनानुसार, हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख डीएनए चाचणीनंतर जाहीर केली जाईल. या कारवाईने इराकमध्ये दहशतवाद्यांचा मोडता घाव घालण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. इराकमध्ये इस्लामिक स्टेटच्या उपस्थितीमुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांनी अनेक महिने कारवाई केली आहे, परंतु हा हल्ला विशेषत: मोठा मानला जातो कारण त्यात एक प्रमुख कमांडर ठार झाला आहे. इराकी आणि अमेरिकन सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांनी या कारवाईत यश मिळाले आहे, ज्यामुळे दहशतवादविरोधी लढाईला अधिक बळ मिळाले आहे.