Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: शिवसेनेच्या ‘या’ निर्णयामुळे NDA साठी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सोपी होणार; काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Eknath Shinde: एनडीए स्थापन होण्यापूर्वीपासून शिवसेना आणि भाजपची युती आहे. ‘एनडीए’मधील सर्वात जुना आणि विश्वासार्ह मित्र म्हणून शिवसेनेची ओळख आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2025 | 09:55 PM
Maharashtra Politics: शिवसेनेच्या ‘या’ निर्णयामुळे NDA साठी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सोपी होणार; काय म्हणाले एकनाथ शिंदे?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) भक्कम पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देशाच्या इतिहासात सलग २,२५८ दिवस सेवा देणारे अमित शाहजी पहिले गृहमंत्री ठरले. यानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की ३७० कलम रद्द करून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा करणारे, देशातील नक्षलवादाचा बीमोड करणारे आपण सक्षम गृहमंत्री आहेत. सहकारापासून समृद्धीचा ध्यास घेत देशाच्या प्रगतीचा निर्धार करणारे कार्यकुशल, दृढ निश्चयी नेते अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या.

ते पुढे म्हणाले की एनडीए स्थापन होण्यापूर्वीपासून शिवसेना आणि भाजपची युती आहे. ‘एनडीए’मधील सर्वात जुना आणि विश्वासार्ह मित्र म्हणून शिवसेनेची ओळख आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपा युतीला २५ वर्ष पूर्ण झाली. याबाबत बैठकीत चर्चा झाली. ‘एनडीए’ची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते, असे ते म्हणाले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा एनडीएला भक्कम पाठिंबा असेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून यश मिळालं त्याप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

माधुरी हत्तीणबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार आहे. यात राज्य सरकार आणि वनतारा पक्षकार होतील. या प्रकरणी जनभावना लक्षात घेत सरकार त्याचा आदर करेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दिल्लीत अधिवेशन सुरु असून येथे येऊन खासदारांना भेटलो, आपण लपूनछपून काही करत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.

Eknath Shinde Delhi Tour: नाराजी,वाद, आरोप-प्रत्यारोप; एकाच आठवड्यात एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर

शिंदे यांच्या विभागावर लगाम

मुख्यमंत्री कार्यालय सरकारच्या सर्व कामांवर विशेष लक्ष ठेवून आहे. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाच्या फाईलला हिरवा कंदील देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या रकमेची फाईलही मुख्यमंत्र्यांकडे पाठवावी लागेल. आता मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच आमदारांना निधी वितरित करता येईल. निधी वाटपात शिंदे केवळ त्यांच्या पक्षाच्या आमदारांना प्राधान्य देत असल्याचा आरोप होता.

Web Title: Dcm eknath shinde said shivsena support to nda for vice president election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mahadevi Elephant

संबंधित बातम्या

शिवसेनेत कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच जास्त; कोणाचं ऐकायचं पडला प्रश्न
1

शिवसेनेत कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच जास्त; कोणाचं ऐकायचं पडला प्रश्न

महाराष्ट्रात 17, तर पुणे जिल्ह्यात 7 नवीन ग्रामपंचायती; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा
2

महाराष्ट्रात 17, तर पुणे जिल्ह्यात 7 नवीन ग्रामपंचायती; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा

Pratap Sarnaik: “दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा,” प्रताप सरनाईक यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
3

Pratap Sarnaik: “दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा,” प्रताप सरनाईक यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
4

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.