नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी दिलेली अंतिम मुदत रविवारी संपली. सरकारच्या निर्णयापासून वाघा-अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांच्या त्यांच्या देशात परतण्याच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत किती लोक भारत सोडून गेले आहेत आणि किती अजूनही भारतात आहेत. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना आणि पाकिस्तान सरकारने भारतीय नागरिकांना त्यांच्या देशात परतण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमनंतर २४ एप्रिलच्या स्थितीनुसार हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.पंजाब पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत अटारी सीमेवरून ५३७ पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परतले आहेत. याच दरम्यान, ८५० भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.
लहान मुलांसाठी घरी बनवा टेस्टी Cheese Burger; फार सोपी आणि झटपट आहे रेसिपी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचा आदेश दिला होता, ज्याची मुदत आज, २७ एप्रिल रोजी संपली आहे. वैद्यकीय व्हिसाधारकांसाठी २९ एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. १२ प्रकारच्या व्हिसाधारकांसाठी भारत सोडण्याची मुदत २७ एप्रिलला संपली आहे, तर SAARC व्हिसाधारकांसाठी ही मुदत २६ एप्रिल होती. मात्र, दीर्घकालीन व्हिसाधारकांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात परतणाऱ्या नागरिकांवरील मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत ५३१ नागरिक वाघा अटारी सीमेवरून त्यांच्या देशात परतले आहेत. रविवारी, २३७ पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात परतले, तर ११६ भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले. यानंतर, पाकिस्तानातून परतणाऱ्या नागरिकांची संख्या ८४३ झाली आहे.
२४ एप्रिल रोजी २८ नागरिक पाकिस्तानला गेले आणि १०५ भारतीय परतले
२५ एप्रिल रोजी १९१ नागरिक पाकिस्तानला गेले आणि २८७ भारतीय परतले
२६ एप्रिल रोजी ७५ नागरिक पाकिस्तानला गेले आणि ३३५ भारतीय परतले
२७ एप्रिल रोजी २३७ नागरिक पाकिस्तानला गेले, ११६ भारतीय परतले
MI vs LSG : Jaspreet Bumrahची कमाल, IPL मध्ये मुंबई इंडियन्ससाठी केली मोठी कामगिरी, असे करणारा ठर
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर केंद्रसरकारकडून पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलत पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेले पाकिस्तानी नागरिक २९ एप्रिलपर्यंत भारतात राहू शकतात, परंतु त्यानंतर त्यांना भारत सोडावा लागेल.
सरकारच्या निर्णयानंतर आतापर्यंत ५३१ नागरिक पाकिस्तानात परतले आहेत. दरम्यान, इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने दिल्ली पोलिसांना एक अहवाल सादर केला आहे. आयबीने आपल्या अहवालात दिल्लीच्या विविध भागात राहणाऱ्या ५,००० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली आहे आणि त्यांची माहिती दिल्ली पोलिसांना दिली आहे, ज्यांच्याविरुद्ध २९ एप्रिलनंतर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.