Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Election 2025: आपच्या आमदारांना ऑफर, अरविंद केजरीवालांचा दावा; भाजपची एलजीं’कडे ACBचौकशीची मागणी

AAP आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. AAP ने भाजपवर आरोप केला आहे की, त्यांचे आमदार फोडण्यासाठी त्यांना 15-15 कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 07, 2025 | 03:22 PM
Delhi Assembly Election 2025: आपच्या आमदारांना ऑफर, अरविंद केजरीवालांचा दावा; भाजपची एलजीं’कडे ACBचौकशीची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशीच राजकीय वादळ उठले आहे. काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल, संजय सिंग आणि अन्य नेत्यांनी, आम आदमी पक्षाच्या (AAP) सात आमदारांना आम आदमी पक्ष सोडण्यासाठी 15-15 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला आहे.   या आरोपांनंतर दिल्ली भाजपचे सरचिटणीस विष्णु मित्तल यांनी दिल्लीच्या उपराज्यपालांना पत्र लिहून भ्रष्टाचारविरोधी विभाग (ACB) आणि अन्य तपास यंत्रणांकडून एफआयआर नोंदवून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवण्याची मागणी

विष्णु मित्तल यांनी अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्याची मागणी केली आहे. यावर उपराज्यपाल विनय सक्सेना यांनी ACB ला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे AAP आमदारांच्या खरेदी-विक्रीच्या आरोपांची तपासणी केली जाणार असून अहवाल उपराज्यपालांना सादर केला जाईल.

Rahul Gandhi on Maharashtra Election: पाच महिन्यात 39 लाख मते कुठून वाढली…? राहूल गांधींचा निवडणूक आयोगाला थेट सवाल

AAP चा आरोप – १५ कोटी रुपयांची ऑफर

AAP आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. AAP ने भाजपवर आरोप केला आहे की, त्यांचे आमदार फोडण्यासाठी त्यांना 15-15 कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. ६ फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले की, भाजपने ‘AAP’ च्या 16  आमदारांना मोठी रक्कम ऑफर करत पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला. AAP च्या वरिष्ठ नेत्यांनी देखील हे आरोप करत “लोकशाहीवर हल्ला” असल्याचे म्हटले आहे. तसेच,  निवडणूक संपल्यानंतर भाजप दिल्लीतील ‘AAP’ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.

AAP चे काही आमदार मीडियासमोर येऊन भाजपने त्यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा करत आहेत. मुकेश अहलावत (सुल्तानपूर माजरा), प्रेम चौहान (देवली), अंजना पार्चा (त्रिलोकपुरी), विनय मिश्रा (द्वारका) या आमदारांनीही त्यांना भाजपकडून फोन आल्याचा दावा केला आहे.  मुकेश अहलावत यांनी आरोप केला आहे की, त्यांना भाजप नेते प्रवेश साहिब सिंग वर्मा यांच्याकडून फोन आला होता. त्यांना 15 कोटी रुपये आणि मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती.

Rahul Gandhi on Maharashtra Election: पाच महिन्यात 39 लाख मते कुठून वाढली…? राहूल गांधींचा निवडणूक आयोगाला थेट सवाल

संजय सिंग ACB कार्यालयात दाखल

AAP खासदार संजय सिंग यांनी ACB चौकशीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत सांगितले की, ते स्वतः ACB कार्यालयात जाणार असून भाजपकडून कोणत्या क्रमांकावरून फोन आले, याचीमाहिती दिली जाणार आहे. भाजप फक्त ड्रामा करत आहे, पण आम्ही खरी तक्रार करण्यासाठी आलो आहोत. भाजप सोशल मीडियावर आमचे ट्विट पाहून आता जागी झाली आहे.

संजय सिंग यांनी भाजपवर हल्लाबोल करत  म्हणाले की, “भाजपला आमच्या बाबूजींच्या (मोठ्या नेत्यांच्या) इशाऱ्याची वाट पाहत होते, त्यामुळे ते आता चौकशी सुरू करत आहेत. आतापर्यंत भाजपने १६ हून अधिक आमदारांशी संपर्क साधला आहे, ज्यांची माहिती आम्ही आधीच जाहीर केली आहे.”

Web Title: Delhi assembly elction 2025bjp demands acb inquiry from lg regarding offer to aap mlas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • Delhi Assembly election 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.