Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Assembly Election 2025: भाजपने भेदला केजरीवालांचा गड; ‘या’ प्रमुख कारणांमुळे ‘AAP’ चा दारुण पराभव

Delhi Assembly Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत यश प्राप्त केले आहे.  कॉँग्रेसला तर खाते देखील उघडता आलेले नाही. आम आदमी पक्षाला केवळ 22 जागा जिंकता आल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 08, 2025 | 06:20 PM
Delhi Assembly Election 2025: भाजपने भेदला केजरीवालांचा गड; 'या' प्रमुख कारणांमुळे 'AAP' चा दारुण पराभव

Delhi Assembly Election 2025: भाजपने भेदला केजरीवालांचा गड; 'या' प्रमुख कारणांमुळे 'AAP' चा दारुण पराभव

Follow Us
Close
Follow Us:

Aam Aadmi Party Loss Reasons: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा दणदणीत यश प्राप्त केले आहे.  भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. तर 10 वर्ष दिल्लीत सत्ता असणाऱ्या आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. कॉँग्रेसला तर खाते देखील उघडता आलेले नाही. आम आदमी पक्षाला केवळ 22 जागा जिंकता आल्या. दरम्यान आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा देखील पराभव झाला आहे. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा हे नवी दिल्लीतून विजयी झाले आहेत. दरम्यान 10 वर्षे सत्ता असणाऱ्या आपचा दिल्लीत कशामुळे पराभव झाला, याची कारणे जाणून घेऊयात.

विद्यमान सरकारविरुद्ध असंतोष 

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सरकारविरुद्ध दिल्लीत काहीशी नाराजी पाहायला मिळाली. नवी दिल्ली येथून निवडणूक लढणाऱ्या केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली या भागात श्रीमंत ते गरीब अशा प्रत्येक वर्गातील नागरिक वास्तव्य करतात. दरम्यान यावेळेस सामान्य जनतेचा केजरीवाल आणि त्यांच्या पक्षावर विश्वास नसल्याचे पाहायला मिळाले. पाणी, वीज आणि अन्य सुविधा यांच्याबद्दल नाराजीचे चित्र दिसून आले.

मजबूत विरोधी पक्ष

भाजपने नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले होते. प्रवेश वर्मा यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. कॉँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना तिकीट दिले. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत शीला दीक्षित यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ता प्राप्त केली होती. मात्र या भागातील मतदारांनी आपला कौल प्रवेश वर्मा यांना दिल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: PM Narendra Modi: दिल्लीतील BJP च्या अभूतपूर्व विजयावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मतदारांची नाराजी

दिल्लीमध्ये एक विशिष्ठ वर्ग जो आम आदमी पक्षाचा कोअर मतदार म्हणून ओळखला जायचा. तो मतदार देखील केजरीवाल आणि आम आदमी पक्ष यांच्यावर नाराज दिसला. रोजगार, जीवनावश्यक सुविधा, दारू घोटाळा, पाणी, वीज असे मूलभूत प्रश्न सुटू न शकल्याने कोअर मतदार देखील नाराज झाला आणि त्याने आपले मत भाजपच्या पारड्यात टाकले.

हेही वाचा: Arvind Kejriwal On Delhi Election: “आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो…”; पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया

भ्रष्टाचार आणि घोटाळे

अरविंद केजरीवाल हे प्रामाणिक, इमानदारीचे राजकरण करणार असल्याचे सांगून सत्तेत आले. मात्र त्यांच्याच सरकारवर अनेक घोटाळे केल्याचे आरोप झाले. दारू घोटाळ्यात त्यांना तुरुंगात जावे लागले. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या सर्व आरोपांचा देखील फटका मोठ्या प्रमाणात आम आदमी पक्षाला बसला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीत भाजपने मोठे यश मिळवले आहे. दिल्लीच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक होते. त्यांनी अनेक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. आज पुण्यातून बोलताना फडणवीस यांनी दिल्लीतील विजयावर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिल्ली विधानसभेवर 27 वर्षांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला आहे. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दिल्लीच्या जनतेने विश्वास ठेवला.”

Web Title: Delhi assembly election result 2025 know the reasons of aam adami party and arvind kejriwal bjp win 48 seats election marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • BJP
  • Delhi Assembly Election

संबंधित बातम्या

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
1

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
2

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
3

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
4

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.